कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन खर्चात वाढ करण्याची गरज – पंतप्रधान

नवी दिल्ली- भारताने ११ व्या पंचवार्षिक योजनेत ३.५ टक्के कृषी क्षेत्रातत वाढ केली आहे पण पुढच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेत (२०१२-२०१७) कृषीक्षेत्र ४ टक्क्यांनी वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न असेल असे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या सुवर्णजयंती पदवीदान कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.

सरकार १२ व्या योजनेत कृषी क्षेत्रातील  संशोधन व विकासावर दुपटीने खर्च करण्यास वचनबध्द आहे. लक्ष केंद्रित करणार आहे, असेही ते म्हणाले. चालू पंचवार्षिक योजनेतील कृषी विकासाची वार्षिक ३.५ टक्क्यांची गती निश्चितच मागच्या पंचवार्षिक योजनेच्या मानाने समाधानकारक असली तरी पुढील पंचवार्षिक योजनेत ही गती आणखी वाढली पाहिजे. ती किमान ४ टक्क्यांपेक्षा जास्त असावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

कृषी विकासाची उच्चगती गाठणे अवघड नाही, पण त्यासाठी कंेद्र आणि राज्य सरकारने जिद्दीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे खडे बोल देखील पंप्रधानांनी याच कार्यक्रमाच सुनावले. या क्षेत्राात होणार्‍या संशोधनाचा उपयोग आपल्यालाच होईल. भविष्यातील उद्दिष्टये गाठण्यासाठी आपली कृषी संशोधन यंत्रणा सुसज्ज केली पाहिजे. त्यासाठी १२ व्या योजनेत राष्ट*ीय उत्पनातील २ टक्के खर्च कृषी संशोधन आणि विकासावर खर्च करण्यास सरकार वचनबध्द आहे, असेही पंतप्रधान सिह यांनी स्पष्ट केले. 
  

Leave a Comment