डीजीसीएची किगफिशरच्या सीईओंना नोटीस, उड्डाणे सोमवारीही रद्द

नवी दिल्ली,दि.२० फेब्रुवारी – किगफिशरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल यांना नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) नोटीस बजावली असून त्यांना मंगळवारी डीजीसीएच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, किगफिशरने सोमवारी मुंबई आणि बंगळूरूतील २१ उड्डाणे रद्द केली.प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता किगफिशरने रविवारी ३० उड्डाणे रद्द केली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. किगफिशर वारंवार उड्डाणे रद्द करत असल्यामुळे डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देवून संपूर्ण अहवाल मागितला आहे. परंतु, अद्यापही किगफिशरने कोणताही अहवाल नागरी विमान महासंचालकांकडे सुपूर्द केलेला नाही. या प्रकरणामुळे किगफिशरचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. किगफिशरवरील कारवाईबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अजीत सिह यांचा विचारविनिमय सुरु आहे. परिस्थिती आणखी खालावल्यास किगफिशरचा परवाना रद्द करण्यात येवू शकतो. परंतु, आताची स्थिती लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास किगफिशरने व्यक्त केला आहे.
यासंदर्भात अग्रवाल यांनी सांगितले की, ‘कोणत्याही विमानतळावरील सेवा बंद करण्याचा आमचा विचार नाही. तसेच, आणखी दहा विमाने प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होतील. आम्ही गुंतवणुकदारांशी चर्चा करत आहोत. लवकरच भांडवलाच्या फेरगुंतवणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल’.

Leave a Comment