शिवकालीन गड किल्ल्याच्या विकासासाठी ८५ कोटींची तरतूद- मुख्यमंत्री चव्हाण

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे  जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी आणि शिवकालीन गड किल्ल्यांच्या विकासासाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल शिवनेरीवर केली. शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आतापर्यंत २२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ऐतिहासिक वारसा जपत पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८२ व्या जयंतीनिमित्त काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शिवनेरी किल्ल्यावर अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी स्थानिक कालकारांनी शौर्यावर आधारित  तलवार बाजी, दांड पट्टा अशा साहसी कला व  मर्दानी खेळ सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शिवजयंतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयाजित पल्स पालिओ मोहीम, वृक्षारोपण व पेयजल मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सविताताई दगडे, आमदार बापूसाहेब पठारे, विनायक मेटे, विभागीय आयुत्त* प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, पोलिस अधिक्षक शहाजीराव सोळुंके आदी  उपस्थित होते.
     किल्ले शिवनेरीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी व महाराजांशी संबंधित रायगड, प्रतापगड, सिहगड, सिधुदुर्ग, विजयदुर्ग अशा सर्वच  किल्ल्यांच्या विकासासाठी शासनाने ८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शिवनेरी किल्ल्याचे सुशोभिकरण व अन्य सोयी सुविधांची कामे सुरु आहेत. या ठिकाणी येणार्‍या पर्यटक व भाविकांना योग्य ती सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शासनाची आहे. ऐतिहासिक वारसा जपत या परिसराचा विकास व्हावा, असा शासनाचा मानस असून यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट* राज्याच्या स्थापनेच्यावेळी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी २७ एप्रिल १९६० रोजी महाराष्ट*ाचा मंगल कलश शिवनेरी किल्ल्यावर आणला होता.  येथूनच त्यांनी प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल सुरु केली.  त्यांचे जन्म शताब्दी वर्षही शासन साजरा करीत असल्याचेही त्यांनी  सांगितले.
     पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व व पराक्रमाला तोड नाही. त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, ही सर्वांचीच इच्छा आहे. शिवनेरीच नव्हे तर अन्य किल्ल्यांचा व परिसराचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार आहे. छत्रपती शिवरायांनी हिदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या स्मरणार्थ शिवरायांचे जागतिक स्तरावरचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही पवार  म्हणाले. 

Leave a Comment