पारडगाव तलावात कदम्ब पक्षी आढळले

नागपूर- पारडगाव तलावावर युरोपसह आफ्रिकन सायबेरीयन व इतर देशातील स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. यंदा थंडीचा मुक्काम वाढल्याने स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्कामही वाढला. २००६ मध्ये ३९८ पट्ट कदम्ब, स्वॉन ग्रीस माहिती गोळा करणे होता. सलग चार वर्षापासून या पक्ष्यांची नोंद होऊ लागल्याने तलावाची जैवविविधता उत्तम असल्याचे संकेतस्थळावर मत नोंदविले आहे. पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल बोलताना तरुण बालपांडे म्हणाले की, तीन कॉलर केलेले कदम्ब गुंज पक्षी प्रथमच पारडगाव तलावावर आढळून आले. सलग चार वर्षांपासून कॉलर लावलेल्या पट्टा कदम्ब पक्ष्यांची नोंद होत आहे.
सलग चार वर्षे एकाच तलावावर आढळण्याची पहिलीच घटना आहे. जैवविविधता उत्तम असलेल्या तलावांवर सलग चार वर्षे या पक्ष्यांची नोंद होऊ शकते, असे गिलबर्ट यांचे म्हणणे आहे. परंतु आता या तलावाचे पाणी उद्योगाला पुरविण्यात येत आहे. यामुळे या तलावाची जैवविधिता धो*यात येऊ शकते. पारडगाव तलावावर सलग चार वर्षापासून या पक्ष्यांची नोंद झाली हे गौरवास्पद असले तरी आता शासनाने या तलावाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी आता पक्षीप्रेमींनी संघटित होण्याची गरज असल्याचे मत माजी मानद वन्यजीव रक्षक गोपाल ठोसर यांनी व्यत्त* केले.

Leave a Comment