टीम अण्णांविरूद्ध एफआयआर दाखल करण्याची याचिका न्यायालयाने नाकारली

दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमविरूद्ध तक्रार दाखल करण्यास येथील न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नाकारले आहे. गेल्या वर्षातील ऑगस्ट महिन्यात अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात राष्ट*ध्वजाची अवहेलना करण्यात आल्याचे सांगून तक्रार दाखल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
राष्ट*ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कोणताही ठोस पुरावा नाही आहे. त्यामुळे टीम अण्णांविरूद्ध एफआयआर दाखल करता येणार नसल्याचे मॅजिस्ट*ेट अनिल कुमार यांनी सांगितले. तक्रारकर्ताकडे सगळे पुरावे असतील आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तपासाची गरज नसेल तर एफआयआर नोंदविण्यासाठी आदेश द्यावा लागत नाही, असे मला वाटत असल्याचे कुमार यांनी सांगितले.
राष्ट*ध्वजाची अवहेलना केल्यामुळे अण्णा हजारे, किरण बेदी, अरविद केजरीवाल, मनीष सिसोडीया आणि इतर सहा जणांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत अशी तक्रार वकिल रविद्र कुमार यांनी केली होती. यावर न्यायालयाने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी योग्य ते पुरावे सादर करावेत असे न्यायालयाने कुमार यांना सांगितले आहे. याप्रकरणी कुमार यांनी प्रसारमाध्यमांचे अहवाल आणि फोटोग्राफ्स पुरावे म्हणून सादर केले आहेत. दरम्यान, याच्याशी निगडीत आणखी पुरावे सादर करण्यास कुमार यांना सांगण्यात आले आहे. तसेच, २ एप्रिल रोजी साक्षीदारांची साक्ष घेण्यात येणार आहे.
कुमार यांनी सादर केलेल्या छायाचित्रात किरण बेदी यांनी फाटलेला राष्ट*ध्वज परिधान केला आहे. तसेच, इतर सदस्यांनी अवैधरीत्या राष्ट*ध्वजाला हाताळल्याचे दाखवले आहे. 

Leave a Comment