रेल्वे तिकीट नोंदणी आता ४ महिने आगाऊ

नवी दिल्ली – प्रवाशांना आपल्या प्रवासाची योजना आखणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी रेल्वेने आगाऊ तिकीट आरक्षणाचा कालावधी ९० दिवसांवरून वाढवून १२० दिवसांचा केला आहे. १० मार्चपासून प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नवी दिल्ली येथे रेल्वेच्या व्यावसायिक विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

आगाऊ आरक्षण कालावधी १५ दिवसांचा असणार्‍या ताज एक्सप्रेस आणि गोमती एक्सप्रेस या कमी पल्ल्याच्या गाडयांच्या आरक्षण कालावधीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच परदेशी नागरिेकांसाठी आरक्षण कालावधीची असलेली ३६० दिवसांची मर्यादाही कायम राखण्यात आली आहे. तात्काळ आरक्षण करणाचा दुरूपयोग टाळण्यासाठी रेल्वेने नुकताच ‘तात्काळ’ची मर्यादा ४८ तासांवरून २४ तासांची करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर आता तिकीट आरक्षणाच्या कालावधीत वाढ करण्याचा घेण्यात आलेला निर्णय लक्षवेधी ठरत आहे.

Leave a Comment