अमेरिकी हल्ल्यात चार संशयीत दहशतवादी ठार

इस्लामाबाद- पाकिस्तानातील सुदूर सीमावर्ती क्षेत्रातील उत्तर वझिरिस्तान येथे गुरुवारी अमेरिकेने केलेल्या ड*ोन हल्ल्यात चार संशयित दहशतवादी ठार झाले आहेत. यात अल् कायदा व तालिबान या दहशतवादी संघटनांमध्ये मध्यस्थी करणार्‍या एका दहशतवाद्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.उत्तर वझिरिस्तानच्या मिरानशहा परिसरात अमेरिकन मानवरहित विमानातून दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या अहवालानुसार अल् कायदा व तालिबान या दोन संघटनांसाठी मध्यस्थ म्हणून काम करणारा बदार मन्सूर देखील या हल्ल्यात ठार झाला आहे. मिरानशहा परिसरात झालेली अशा प्रकारची ही दुसरी कारवाई असून, गेल्या बुधवारी अमेरिकेने केलेल्या कारवाईत दहा संशयित दहशतवादी ठार झाले होते.मिरानशहा परिसरातील इमारतीत दहशतवादी भाड्याने घर घेऊन राहत होते, असे अधिकार्‍यांनी सांगितले. तालिबान, अल् कायदा आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांचे उत्तर वझिरिस्तानमध्ये मोठे जाळे असून, तेथून अनेक दहशतवादी कारवाया चालतात.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाटोने केलेल्या हल्ल्यात २४ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानमधील दुर्गम भागात राबविण्यात येणारी ड*ोन हल्ल्यांची मोहीम काही काळासाठी थांबविली होती.

 

Leave a Comment