युवराजच्या आजारावर जॉन्टी र्‍होड्सला दुःख

नागपूर- दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू खेळाडू जॉन्टी र्‍होड्स याने आज युवराज सिगच्या आजाराबद्दल दुःख व्यत्त* केले. युवराज हा झुंजार खेळाडू असून भारतीय संघाला अनेक सामन्यात त्याने एकहाती विजय मिळवून दिले आहेत. विश्वचषक स्पर्धेतील त्याची कामगिरी कधीच विसरता येणार नाही. परंतु सध्या तो जीवनाच्या कठीण प्रसंगाला तोंड देत आहे. तो यातून लवकरच सावरून मैदानावर परतेल, असा विश्वास जॉन्टीने आज पत्रकारांशी बोलतांना व्यत्त* केला.
क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील अतिशयमहत्वाचा भाग आहे. क्षेत्ररक्षकाने एखादा अशक्यप्राय झेल टिपला किवा खेळाडूला धावबाद केले तर सामन्याची दिशा पलटू शकते. परंतु क्षेत्ररक्षक बनणे ही एका रात्रीत घडणारी बाब नाही. यासाठी हार्डवर्क आवश्यक आहे. टार्गेट एक्सप्लोरेशन या संस्थेतफर्े ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित क्षेत्ररक्षण प्रशिक्षण शिबिरासाठी तो नागपुरात आला आहे.
क्षेत्ररक्षण म्हटले तर जॉन्टी र्‍होड्स हे एकच नाव आजही ऐकायला मिळते. सध्या अनेक खेळाडू चपळ क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जात असले तरी ते सर्व जॉन्टीच्या दर्जापासून बरेच लांब आहेत. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला नवीन ओळख मिळवून देणारा हा जॉन्टी येत्या तीन दिवस विदर्भातील १२० खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहे. पत्रकारांशी बोलतांना तो म्हणाला, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. यासाठी हार्डवर्कचीच गरज आहे. क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा असणार्‍यांनी ही बाब सतत लक्षात ठेवावी. क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी क्रिकेटसोबतच फुटबॉल व हॉकी खेळणे उपयोगी ठरते, असे त्यांनी सांगितले. जॉन्टी र्‍होड्स हा क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी हॉकी खेळत होता, हे येथे उल्लेखनीय.
भारतीयखेळाडूंची प्रशंसा करताना जॉन्टी म्हणाला, आता भारतीयसंघाची ऑस्ट*ेलिया व दक्षिण आफ्रिकेशी तुलना केली जाऊ शकते. आधी मोहम्मद कैफ व युवराज सिग हे दोघेच चपळ क्षेत्ररक्षण करताना दिसायचे. आता विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा व रोहित शर्मा हे त्यांच्या दिमतीला आले आहेत. यामुळे भारतीय क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावला आहे. भारतीय संघाच्या यशात याचा मेाठा वाटा असल्याचे मत त्याने व्यत्त* केले. तसेच संधी मिळाली तर भारतीयसंघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षण होणे आवडेल, असा विचारही त्याने बोलून दाखवला.
हल्ली क्रिकेटचा अतिरेक होतोय, ही बाब खरी आहे. सतत क्रिकेट खेळल्यामुळे खेळाडूंना आराम करण्यास पुरेसा अवधी मिळत नाही व त्यांची कामगिरी खालावते. परंतु, आपल्या संघाला वर्षभरात किती स्पर्धांमध्ये खेळवायचे, हा त्या-त्या देशातील संघटनांचा प्रश्न आहे, असे जॉन्टीने नमूद केले.
१९९३ मध्ये हिरो चषक स्पर्धेतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात टिपलेले पाच झेल, ही आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय कामगिरी असल्याचे जॉन्टीने सांगितले. या सामन्यात जॉन्टीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या बळावर हा पुरस्कार पटकावणारा तो जगातील खेळाडू आहे.

Leave a Comment