पाचवा ‘गजल मोहोत्सव’ ४ मार्च रोजी

मराठी गजलांच्या प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने बांधन जनप्रतिष्ठानच्या वतीने ‘गजलोत्सव’ आयोजीत करण्यात येत आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून येत्या ४ मार्च रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे भरवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पा ठाकूर आणि सुरेशकुमार वौराळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय उर्जामंत्री सुशिलकुमार शिदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक राज दत्त, उर्दू शायर बशर नवाज, उर्दू अभ्यासक डॉ.राम पंडित, लोककला अभ्यासक मधुकर नेराळे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जेष्ठ गजलकार ए.के.शेख यांना तर ‘युवा पुरस्कार’ अमरावतीचे गजलगायक डॉ.राजेश उमाळे यांना शिदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबरच ‘गजलोत्सव’ या स्मरणिकेचे आणि ‘सुरेश भटानंतरची गजल’ या गजलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. महोत्सवा दरम्यान नव्या-जुन्या गजलकारांच्या मुशायरे आणि गजलमैफिलेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उद्घाटन प्रसंगी डॉ.उमाळे आणि जाई देशमुख हे गजलमैफिल सादर करणार आहेत. तर, महोत्सवाचा समारोप संगितकार कौशल इनामदार यांच्या मैफिलीने होणार आहे.

Leave a Comment