पुणे, दि.२५ – सकाळी आठच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बसडेपोमधून एका माथेफिरू ड्रायव्हरने बस पळवून ९ लोकांना मृत्यूमुखी आणि ३० लोकांना जखमी केले. या माथेफिरू ड्रायव्हरने स्वारगेट डेपोमधून पुणे-सातारा-पुणे ही एसटी पळवली आणि सोलापूरच्या दिशने राँग साईडने ही एसटी दामटवली.सुमारे चाळीस पेक्षा जास्त वाहनांना चिरडून ती बस अर्धा तास पोलिसांना चकवत होती.या माथेफिरू ड्रायव्हरने जवळजवळ २५ किलोमीटरपर्यंत अंदाधुंदपणे गाडी चालवत अनेक वाहनांना ठोकले तसेच डिव्हायडरही तोडला.
संतोष माने असे या माथेफिरू ड्रायव्हरचे नाव असून एका तासाच्या थरारनाट्यानंतर त्याला पोलिसांनी नीलायम टॉकिजजवळ अटक केली आहे.पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.जख्मी नागरिकांवर पुण्यातील हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत.