अल्पवयीन मुलीवर बलत्कार, खून प्रकरणी एंषी गाठलेल्या माणसास जन्मठेप

पुणे, दि. ३ – आज शहरात एकच खळबळ उडाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून करणार्‍या वृध्दास येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोहिनीराज यशवंत कुलकर्णी ( वय, ७९ रा. नारायण पेठ) असे शिक्षा झालेल्या वृध्दाचे नाव आहे. बलात्कार करणे, पुरावा नष्ठ करणे, पोलिसांना खोटी माहिती देणे, पैशाचे अमिष दाखविणे असे आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत. या खटल्याची माहिती अशी की, मोहिनीराज कुलकर्णी व त्यांची पत्नी मृणालिनी हे दोघे वृध्द असल्याने त्यांच्या घरात घरकामासाठी रेखा अनिल रणदिवे ( वय, २८ रा. आंबिल ओढा झोपडपट्टी, दांडेकर पूल ) ही महिला येत असे. मृणालिनी या अर्धांगवायूने आजारी आसल्याने त्यांची देखभाल रेखा करत असे. रात्र पाळीला मंगला नावाची महिला कामाला होती. मंगला सुट्टीवर असताना १३ ऑक्टोंबर २००९ रोजी रेखाने आपली मुलगी रोहिणी ( वय, १० ) हिला कुलकर्णी यांच्या घरी नेले. त्यावेळी कुलकर्णीं याने  रोहिणीला गोडबोलून वरच्या खोलीत नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडली तेव्हा रोहिणीची आई डब्बा आणण्यासाठी घरी गेली होती. ती परत आल्यानंतर तिने रोहिणीची चौकशी केली त्यावेळी ती वरच्या रुम मध्ये झोपल्याचे कुलकर्णी यांनी सांगीतले. तत्काळ रेखाने वरच्या रुम मध्ये जावून पाहिले त्यावेळी रोहिणी बेशुध्द अवस्थेत पडलेली दिसली. घाबरलेल्या कुलकर्णीने आपण बलात्कार केला असल्याचे सांगून रेखाला कोणासही सांगू नको असे सांगून पैशाचे आमिष दाखविले. त्यांनतर कुलकर्णी याने रोहिणीला गळफास देवून तिचा खून केला. दोघांनी रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा कांगावा केला. मात्र, पोलीस तपासात व डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्ट वरुन सत्य अखेर बाहेर आहे. दरम्यान, सरकारी पक्षाने रेखाला माफिचा सक्षीदार बनविले. तिने घडलेली वस्तुथिती न्यायालयात सांगीतली. विश्रामबाग पोलीसांनी या गुन्ह्याचा तपास केला.

Leave a Comment