कविता होत जाते तर गाणे लिहितांना कसोटी -पाडगावकर

पुणे, दि.१९- उत्तम कविता लिहिण्या इतकेच चांगले गाणे लिहिणे महत्त्वाचे आणि कठिण आहे.कविता स्फुरते, सुरुवातीला एखादी ओळ सूचते आणि त्यातून कविता होत जाते. पण गाण्यामध्ये प्रसंगानुसार योग्यते शब्द रचून गाणे लिहिण्याची कसोटी असते. मात्र गाण्याप्रमाणे कविता ही कमर्शियल पातळीपर्यंत पोहचत नाही. असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी केले.
आशयसांस्कृतिक आणि परांजपे स्किम्स् यांच्या वतीने आयोजित नवव्या पुलोत्सव तरुणाई महोत्सवात पाडगावकर यांना पुलोत्सव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार  डॉ. श्रद्धानंद ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणे, सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या वेळी सतीश जकातदार, विरेंद्र चित्राव, शशांक परांजपे उपस्थित होते. प्रा. मिलिद जोशी यांनी पाडगावकर यांच्याशी संवाद साधला.
कविता लेखना बद्दल पाडगावकर म्हणाले, कविता लेखन ही माझी साधना आहे. या साधनेतून मी मानवी जीवनातील नानाविध अनुभव व्यत्त* करण्याचा प्रयत्न करतो. हे जीवन समजून घेता आले पाहिजे. माणसाच्या जीवनप्रवासतील अनुभव व्यत्त* करण्यासाठी सतत नवी भाषा शोधून काढण्याचे आणि ती प्रभावीपणे मांडण्याचा मी कवितेतून प्रयत्न करत असतो, जगातला कुठलाही मनुष्यभाषा लिहून वा वाचून शिकत नाही. तर एखादे मुल जन्माला आल्यावर तो भाषा पहिल्यांदा ऐकतो आणि त्यावरुनच ती भाषा शिकण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे कविता वाचून दाखविणे ही एक नैसर्गिक गोष्टच आहे. पुलंना आपल्या भोवती माणसं आवडत. भोवतालच्या लोकांना विनोद ऐकवत श्रोते बनविण्याचा पुलंचा स्वभावच होता. पुलं. विनोद करायचा म्हणून ठरवत नसे. तर विनोद हे स्वाभाविकपणे घडून येत. यावेळी मंत्रशत्त*ी, गोष्ट, पंडित, मुसद्दी, प्रेम म्हणजे प्रेम असतं ,सलाम आदी कविता पाडगावकर यांनी सादर केल्या.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया चित्राव यांनी केले.

Leave a Comment