वडिलांनंतर कोणाचा स्पर्श जाणवला तर तो पुलंचा – नाना पाटेकर

पुणे, दि. १६ – लहानपणासून ज्यांच्यावर पिड पोसला गेला त्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. वडिलांनंतर कोणाचा स्पर्श जाणवला तर तो पुलंचा. पुल स्मृती सन्मानासाठी पात्र आहे किवा नाही हे माहित नाही मात्र पुलंच्या नावाचा सन्मान मला मिळाला आहे याचा आनंद आहे अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुलोत्सव तरूणाईचा मध्ये पाटेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या नंतर श्रीकांत गद्रे यांनी पाटेकर यांच्याशी संवाद साधला  यावेळी ते बोलत होते. नाना म्हणाले, भाईंचे लेखन एक पदरी नव्हते, त्यांच्या पुस्तकातील व्यक्तीरेखांनी कधीही एकटेपणाची जाणिव होउ दिली नाही. पुलंच्या लेखनाचा वरकरणी अर्थ घेऊन हसलो मात्र नंतर जाणवले भाईंचे लेखन एकपदरी नाही त्याला अनेक अंग आहेत. नाटक, सिनेमामुळे पु.ल. देशपांडेंशी तर चित्रकलेमुळे आर.के. लक्ष्मण  यांच्याशी नाते जुळलेले आहे. पुल, विजया मेहता रमाकांत देशपांडे आणि अरविद देशपांडे हे माझ्या आयुष्याचे चार खांब आहेत असे पाटेकर यांनी सांगीतले.
पाटेकर म्हणाले, सतत व्यंग शोधणे हा माझ्यातला आणि भाईंमधला समान गुण आहे. फजितीवर आपण हसतो मात्र सतत फजीती होण्याची तयारी ठेवण्यात खरी गंमत असते आणि त्यामुळेच अभिनय सहजपणे करता येतो तसेच आयुष्यही सुंदर जगता येते. मेहता यांनी मला हे कर असे कधीच सांगीतले नाही माझ्याकडे जे आहे ते त्यांनी काढुन घेतले. दिग्दर्शक जो मगेल ते देण्याची ताकद अभिनेत्याकडे असायला हवी. पुलंचे लोखान मला नेहमीच भावले आहे त्यांच्या ‘गणगोत’मधील रावसाहेब ही व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा असल्याचे पाटेकर यांनी व्यत्त* केली.

सत्तधार्‍यांना ओरबडून काढा
आज लोक संपत्तीचा संचय करण्याच्या मागे आहेत मात्र माणसांचा संचय महत्वाचा असतो. आपल्याच देशातील भष्टाचार थांबविण्यासाठी अण्णा हजारे यांना आंदोलन करावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. काळा पैसा देशात आणु मात्र ज्यांचा काळा पैसा आहे त्यांची नावे जाहीर करणार नाही असे सरकार सांगते हा ढोंगीपणा आहे आणि असा ढोंगीपणा करणार्‍या उच्चपदावरील लोकांना सत्तेतून ओरबाडून काढण्याची आवश्यकता आहे असल्याचे पाटेकर यांनी सांगितले.

लवकरच रंगमंचावर
पु.ल. देशपांडे, आरती प्रभु, बा.भ. बोरकर, बाबा आमटे या व्यत्ति*मत्वांचा आपल्यावरील प्रभाव सांगत नानांनी प्रभु यांच्या कवितांचे, रावसाहेब या व्यत्त*ीरेखेचे अभिवाचन केले. वि.दा. करंदीकर, आरती प्रभु आणि बा.भ. बोरकर यांच्या कवितांचे अभिवाचन करण्यासाठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे पाटेकर यांनी सांगीतले.

Leave a Comment