नाना पाटेकर यांना ‘पु.ल. स्मृती सन्मान’

पुणे- अभिनय या शब्दाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर अभिनय म्हणजे परकाया प्रवेश करण्याची कुवत.अनेक व्यक्ती अभिनय करताना त्याचा निबंध सादर करतात, नानाने मात्र निबंध सादर न करता अभिनयाच्या माध्यमातुन स्वःतचा शोध घेतला असे उद्गार जेष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी काढले.
आशय सांकृतीक व परांजपे स्किम अयोजीत नवव्या पुलोत्सव तरूणाईचा महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेहता यांच्या हस्ते नाना पाटेकर यांना ‘पु.ल. स्मृती सन्मान’ मेहता यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मेहता बोलत होत्या. कमला लक्ष्मण, आशयचे सतिश जकातदार, विरेंद्र चित्राव, शशांक परांजपे यावेळी उपस्थित होते.
मेहता म्हणाल्या, पुलोत्सवामध्ये यायला आवडत कारण इथे खर्‍या अर्थाने उत्सव असतो. पुल म्हणजे एक पर्व होते त्यापर्वाच्या साक्षीने माझ्यासह अनेकजण मोठे झाले. पुलं आणि आरके यांच्यामध्ये एक साम्य आहे ते म्हणजे पुलंनी शब्दरेषांनी  तर आरकेंनी रेषांच्या माध्यमातुन  लोकांना हसविले आणि विचार करायलाही भाग पाडले. तसेच पुल आणि नाना मध्येही साम्य आहे बिनधास्त, मुत्त* निरिक्षण, आपण करतो त्या गोष्टीवरील दृढ विश्वास.
यावेळी आर.के. लक्ष्मण यांना पुलोत्सव विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.पुलोत्सव विशेष सन्मानाचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी असे होते. नाना पाटेकर यांना ‘पुल स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला त्याचे स्वरूप पंचविस हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र असे होते. सन्मानातील रोख रक्कम नानाने नगरच्या स्नेहालय संस्थेला दान केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरेंद्र चित्राव यांनी केले, सूत्रसंचलन सुप्रिया चित्राव यांनी केले.

Leave a Comment