घाशीराम तेंडुलकर यांचा पुष्पगुच्छ

भारतावर आठशे वर्षे असलेली तालीबानी सत्ता उध्वस्त करणार्‍या मराठेशाही आणि नंतर पेशवे यांच्या कामगिरीचा ऐतिहासिक अर्थ समजला नाही तर उरता फक्त त्यातील आवडणार्‍या गोष्टीच्या आधारे केलेल्या विडंबन कथा. घाशीराम कोतवाल ही त्यापैकीच एक. त्याचा चाळीसावा वर्धापन दिन नीलोत्तम पांडव ग्रुपने साजरा केला. श्री विजय तेंडूलकर हे त्याचे लेखक. मराठेशाही आणि पेशवाई यातील वातावरण मांडायचे पण ते वातावरण मांडण्याच्या निमित्ताने त्यावर टीका करायची, हा त्यांना आवडणारा प्रकार त्यानी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात केला.पेशवाई सध्याच्या कोतवालचावडीचा म्हणजे जेथे दगडू हलवाई गणपती बसतो त्या जागेवर पूर्वी कोतवाली चावडी होती. त्याचा एक कोतवाल घाशीराम यांच्या मुलीवर त्या काळातील पुण्यातील तरुण – ते बहुदा पगडी घातलेले असावेत – व एका बाजूला सुसंस्कृतपणाचा आव आणून उत्तरपेशवाईच्या काळातील कांहीशा विस्कळित स्थितीतील तरुणाईचे त्यांनी वर्णन केले आहे. त्यातील गंमतीचा भाग म्हणजे त्या कोतवाली चावडीचा ताबा असणार्‍या घाशीराम नावाच्या कोतवालाला मुलगीच नव्हती. पण त्यावर घाशीराम तेंडूलकर यांचे म्हणणे असे की, त्याना नव्हती बाकीच्याना होती ना  मग तो प्रसंग निश्चतच घडला असणार. १९७१ मध्ये ते नाटक प्रथम पुण्याला झाले तेंव्हा काका वडकेयांनी विरोधाची भूमिका घेतली. विजय तेंडूलकर किवा जे नंतर घाशीराम या नावानेच ओळखले जावू लागले त्यांना प्रोग्रेसिव्ह डॅ*मॅटिक असोसिएशन -पीडीए- नावाच्या प्रायोगिक रंगभूमीवरील तरुणांची साथ लाभली. पीडीचे संस्थापक प्रा. भालबा केळकर यांनी त्या नाटकाला विरोध केला. त्यांचे म्हणणे असे होते की, शिवकालात उभा राहिलेला तालिबानी साम्राज्याला आव्हान देण्याचा बाणा आठशे वर्षाच्या इतिहासात प्रथम निर्माण झाला होता. आज आपल्या देशाचा जेवढा विस्तार आहे तेवढ्या आकाराच्या त्या काळातील तालीबानी सत्तेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आव्हान दिेले येवढेच नव्हे तर येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्याचाच विस्तार होअून पेशव्यांनी बुंदेलखंडाचे स्वराज्यात रुपांतर केले. त्यामुळे सार्‍या उत्तर भारताला स्वातंत्र्याचा आत्मविश्वास आला आणि नंतर दिल्लीवरही मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भारतात महंमद बिन कासीम यांनी केलेल्या आक्रमणानंतर जो तरुणांचा आत्मविश्वास गेला होता तो परत मिळवण्याचे जे काम महाराष्ट*ात झाले व सार्‍या देशात त्यामुळे नवे वातावरण निर्माण झाले पण त्याचा कसलाही लवलेश न दाखवता तेंडुलकरांनी घाशीरामला एक मुलगी निर्माण केली व तिच्या अपहरणाचे नाट्य तयार केले. या वर्धापनदिनानिमित्त हौशी तरुण मंडळीनी जावून त्या नाटकातील सारी संगीत पदे नृत्यावर सादर केली. शनिवारवाडयालाही अडीचशे वर्षापूर्वीची सफर घडविली.
नीलोत्तम पांडव या ग्रुपचे श्री माधव अभ्यंकर याबाबत म्हणाले, हे एक राजकीय प्रहसन आहे. गेल्या चाळीस वर्षात त्या नाटकाने मनोरंजनाचे काम अप्रतिम बजावले आहे आजही त्याची लोकप्रीयता टिकून आहे.म्हणून याचे काही प्रयोग करणार आहोत
.- मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment