जनलोकपालासाठी अण्णा हजारे पुन्हा जंतरमंतरवर

नवी दिल्ली,दि.१२ डिसेंबर-आपल्या मागण्यांचा समावेश असलेले जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी दिल्लीतील जंतर मंतरवर एक दिवसाचे सांकेतिक उपोषण केले. अण्णा हजारे यांना अनेक काँग्रेस वगळता अन्य अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच सामाजिक संघटनांनी पाठिबा दर्शविण्यासाठी भाऊगर्दी केली होती.
रविवारी सकाळी महाराष्ट* सदनातून निघाल्यानंतर अण्णा हजारे राजघाटावरील महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी गेले. तेथे अर्धा तास चितन, मनन केल्यानंतर ते जंतरमंतरवर पोहोचले. टीम अण्णामधील आपल्या सहकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर अण्णांच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होते. २७ डिसेंबरपासून भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन सुरु केले जाणार असून लोकसभा निवडणुकांपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. प्रत्येक राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती, दुय्यम दर्जाचे अधिकारी तसेच नागरी सनद यांचा लोकपाल विधेयकांत समावेश करण्याचे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांनी अण्णा हजारे यांना दिले. मात्र हे आश्वासन पाळले गेले नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जनलोकपाल विधेयकावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांनी १४ डिसेंबर रोजी सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून १९ डिसेंबर रोजी लोकपाल विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे

Leave a Comment