नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोघे यांची निवड

पुणे,दि.२७- सांगली येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोघे यांची निवड करण्मात आली आहे.पुढील वर्षी जानेवारी महिन्मात ९२ वे अखिल भारतीम नाट्यसंमेलन होणार आहे.नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडाळातील ४२ सदस्यांच्मा बैठकीत अध्यक्ष निवडण्यात आला. अध्यक्षपदासाठी श्रीकांत मोघे आणि ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्यात लढत  होती.
आज मुंबईत नाट्य परिषदेची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. नाट्यसंमेलन सांगली येथे होणार आहे. त्यामुळे आपल्याला अध्यक्षपद मिळाल्यास जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण असेल, असे मोघे मांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. तर अध्यक्षपद न मिळाल्यास प्रतिनाट्य संमेलन भरवण्याची घोषणा कुलकर्णी यांनी केली होती यामुळे या निवडी  कडे संपूर्ण नाट्य रसिकांचे लक्ष लागलेले होते. माटुंगा यशवंत नाट्यगृहात ही बैठक झाली. परंतु, त्यात प्रचंड वाद झाला. नाट्य परिषदेच्या सभासदांमध्मे जोराचे भांडण झाले. बैठकस्थळाच्या बाहेरपर्यंत भांडण ऐकू येत होते. परंतु, वाद संपुष्टात आल्याचे सांगून अध्यक्षनिवडीची घोषणा करण्यात आली.
श्रीकांत मोघे यांची कारकिर्द
मोघे यांचा जन्म सांगलीतील किर्लोस्करवाडीत ६ नोव्हेंबर १९३२ मध्ये झाला. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे घेतले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत झाले आणि महाविद्यालयात असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. मोघे यांनी आचार्य अत्रे यांच्या ’लग्नाची बेडी’, पु.ल. देशपांडे यांच्या ’तुज आहे तुजपाशी’, ’वार्‍यावरची वरात’ यासारख्या नाटकांत अभिनयकेला आहे. बाबुराव पेंढारकर निर्मित बाळ कोल्हटकर यांचे ’सीमेवरून परत जा’ या व्यावसायिक नाटकात त्यांनी अॅलेक्झांडर म्हणून काम केले. ’गारंबीचा बापू, बिकटवाट वहिवाट आदी साठहून अधिक नाटकांत प्रमुख भूमिका केल्या आहेत. नंदिनी, निवृत्ती ज्ञानदेव, मधुचंद्र, शेवटचा माणूस राम, आम्ही जातो आमच्या गावा, दोन्ही घरचा पाव्हणा, मनचली, सिंहासन यासारख्या पन्नासहून अधिक चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. ’पुलकीत आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणी त्यांनी दौराकेला आहे. महाराष्ट* शासनाचा कलागौरव पुरस्कार, शाहू छत्रपती पुरस्कार, काशिनाथ घाणेकर पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार यासारखे अनेक पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

Leave a Comment