मनसेमुळे चवदार कोळी खाद्यपदार्थांना मिळाले वलय

मुंबई,दि.२२नोव्हेंबर-मनसे आयोजित कोळी महोत्सवामुळे कोळी खाद्यपदार्थांना वलय मिळाल्याची भावना संपूर्ण कोळी समाजात पसरली आहे. महोत्सवाच्या निमित्ताने सर्वसामान्य मुंबईकरांना कोळी खाद्य संस्कृतीची खर्‍या अर्थाने ओळख झाली आहे. सध्या मुंबईत मराठी खाद्यपदार्थांची उपहारगृहे कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कोळी महोत्सवाला सर्वच स्तरातून मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे विशेषतः कोळी महिला वर्गाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी काळात कोळी फूड कॅटरींगला मनसे कोळी महोत्सवामुळे सुगीचे दिवस येतील, असा विश्वास आहे.
नोव्हेंबर – डिसेंबर महिने खास मत्स्यप्रेमींसाठी पर्वणी असलेले समजले जातात. त्यामुळे खास लोकाग्रहास्तव कोळी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. कोळी खाद्य महोत्सवात मुंबईतील कोळी समाजाच्या सुमारे ४० संस्थांनी भाग घेतला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केला जाणारा हा एकमेव कोळी महोत्सव असून भविष्यात कोळी फूड हा मालवणी, कोल्हापूर, गोवन अशा खाद्य प्रकारांइतकाच लोकप्रिय ब्रँड होण्याची चिन्हे आहेत. मनसे कोळी महोत्सवाला मत्स्यप्रेमी खवय्यांनी पहिल्या दिवसापासून गर्दी केली. आ. नितीन सरदेसाई यांच्या नियोजनाला व कल्पेकतेला दाद देताना चित्रपट, नाट्य, उद्योग, हॉटेल, फॅशन यासारख्या विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. प्रामुख्याने सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, जितेंद्र, श्रेयस तळपदे, सोनू निगम, महेश मांजरेकर, सिध्दार्थ जाधव, जॉनी लिव्हर, सयाजी शिदे, अवधूत गुप्ते, मधुरा वेलणकर, सुलभा देशपांडे, नीमा कुलकर्णी, सुकन्या व संजय मोने, अतुल परचुरे, विनय येडेकर, अश्मित पटेल, राजेश श्रुंगारपुरे यांच्यासह हॉटेलियर्स सुहास अवचट, विठ्ठल कामत, फॅशन डिझायनर शायना एनसी, केसरी ट*ॅव्हल्सच्या वीणा पाटील, आंतरराष्ट*ीय किर्तीचा हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी या कोळी महोत्सवात हजेरी लावली.
कोळी बँड, कोळी नृत्य, सजवलेली होडी असा अस्सल कोळीवाडाच तिथे अवतरला होता. सर्वत्र तळलेले पापलेट, बोंबिल, सुरमई, हलवा यांचा घमघमाट आसमंतात पसरला होताच पण मुंबईच नव्हे तर संबंध कोकण किनारपट्टीतील कोळीवाड्यांची खासियत असलेल्या चिबोरी कालवण, बोंबिल वडे, कोलंबी पॅटीस, जवळा पॅटीस, शिंपल्याचं भरलं, कुपा बिर्याणी, रावस बिर्याणी, ओला जवळा, गाभोळी कोशिबीर अशा विविध कोळी डिशेसवर मुंबईकर फिदा झाल्याचे चित्र दिसत होते. माकलं म्हणजेच भरलेला ऑक्टोपस तसेच कोलीम कांजी अशा अनोख्या कोळी रेसिपिजवर आबालवृध्द संपूर्ण कुटुंबासह ताव मारताना दिसत होते. मनसे कोळी महोत्सवामध्ये फक्त कोळी समाजाच्या संस्थांना स्टॉल्स देण्यात येत असल्याने पारंपारिक पण अनोखे कोळी खाद्य विश्व मुंबईकरांना अनुभवायला मिळाले अशी स्वाभाविक प्रतिक्रिया खवय्यांकडून व्यक्त होत होती.

Leave a Comment