वेश्या व्यवसाय प्रकरणी अभिनेत्रीला अटक

पुणे, दि. २०( प्रतिनिधी) – वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक केलेल्या काश्मिरी अभिनेत्रीची जामीनदार न मिळाल्याने  रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर तिच्या सोबत असलेल्या एजंटला २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या दोघांना पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सापळा रचुन अटक करण्यात आली होती.अजराजान गुलाम अहमद शेख (वय २१, रा. अंधेरी, पश्चिम मुंबई) हिला या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर निरज  अशोक बदानी(वय २७, रा. विरा देसाई रस्ता, अंधेरी) याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबतची हकिकत अशी, शेख ही काश्मीरी अभिनेत्री असून टीव्हीवर सध्या सुरू असलेल्या कसौटी मालिकेत ती काम करते. ती वेश्याव्यवसाय  करत असून ती एका तासासाठी दीड लाख रुपये घेते आणि तिचे वास्तव्य केवळ पंचतारांकित हॉटेलमध्ये असायचे. काल सायकांळी ती पुण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती, त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली होती. आज या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने या अभिनेत्रीला जामीन देण्याची तयारी दर्शविली मात्र त्यासाठी वैयक्तिक अथवा रोख रकमेवर जामीन न देता जामीनदार द्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र जामीनदार देयास या अभिनेत्रीच्या वकिलांनी असमर्थता दर्शविली, त्यामुळे तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर या प्रकरणातील एजंट भदानी याला येत्या २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. पी.एस. माने यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. हेमंत थोरात यांनी काम पाहिले.

छायाचित्र सौजन्य – मिड डे दैनिक

 

Leave a Comment