संपूर्ण जग अमेरिकी बॉम्बच्या टप्प्यात

वॉशिग्टन,दि.१९ नोव्हेंबर- आवाजापेक्षा पाचपट अधिक वेगाने प्रवास करु शकरणार्‍या एका बॉम्बवाहक विमानाची चाचणी अमेरिकेने नुकतीच यशस्वी केली. हवाई बेटांवरील एका चाचणी केंद्रावर ही चाचणी झाल्याचे पँटागॉनच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. सुमारे २ हजार ३०० किमीवर असलेल्या क्वाजलीन अॅटोल या भागामध्ये केवळ अर्ध्या तासात हे विमान पोहचले, अशी माहिती बीबीसीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे.

बीबीसीच्या माहितीनुसार हे विमान हायपरसॉनिक (तीव्र गतीचे स्वनातीत विमान) वेगाने प्रवास करु शकते. आवाजापेक्षा पाचपट जास्त वेग असलेले हे विमान तासभरात तब्बल सहा हजार किमीचा पल्ला गाठू शकते. याचाच अर्थ वेळप्रसंगी अमेरिका केवळ तासाभराच्या कालावधीत क्षेपणास्त्रे डागून जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातील देशाला बेचिराख करू शकते. प्रॉम्प्ट ग्लोबल स्ट*ाईक असा प्रकल्प अमेरिकेने हाती घेतला असून त्याचेच पहिले पाऊल म्हणून या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. जगाला आपल्या बॉम्बच्या टप्प्यात आणण्याच्या या प्रकल्पात अमेरिकेने तब्बल २४ कोटी डॉलर्स गुंतविले आहेत.           

Leave a Comment