संतांनी सर्व धर्म समभावाचा संदेश दिला – डॉ. एस. एन. पठाण

पुणे, दि.१८ नोव्हेंबर- ‘‘समाजातील सर्व घटकांना आपलेपणाने सामावून घेऊन संतांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला’’, असे उद्गार राष्ट*संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण यांनी काढले.एमआयटी आणि आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुत्त* विद्यमाने संत ज्ञानेश्वर यंाच्या ७१५ व्या संजीवन समाधी सोहळा आणि जागतिक सहिष्णुता सप्ताहानिमित्त लोकशिक्षणपर कार्यक्रम आयोजिले आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पठाण बोलत होते. अध्यक्षस्थानी देहू येथील तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे तसेच एमआयटीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड  उपस्थित होते.
डॉ. एस. एन्. पठाण म्हणाले,‘‘श्रीगोंदा येथे वारकरी संत शेख महंमद यांचा दर्गा आहे. बाबा अनगड शा हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते. व त्यांच्या दर्ग्याजवळ तुकाराम महाराजांच्या पालखीची पहिली आरती होते. अशी अनेक उदाहरणे सापडतील. पंढरीच्या वारीमध्येसुद्धा अनेक मुसलमान बांधव वारकर्‍याच्या भूमिकेतून सामील झालेले असतात. अशा प्रकारे शुद्ध मानवतावादाचा प्रसार संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्वांनी केला आहे. राष्ट*संत तुकडोजी महाराज यांनी जी मंदिरे उभी केली, तेथे त्यांनी संतांच्या प्रतिमा प्रदर्शित केल्या होत्या.’’
‘‘राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समतेचे आंदोलन उभे केले, त्यामागे संत विचारांचीच प्रेरणा होती  व तीच त्याची शत्त*ी होती. किबहुना आपल्या देशात जो उदारमतवाद दिसून येतो, त्यामागील आचार आणि विचार यांची पेरणी संत मंडळींनीच केली आहे’’, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.
शिवाजीराव मोरे म्हणाले,  ‘‘ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे वारकर्‍यांचा श्वास आणि तुकाराम महाराज म्हणजे त्यांचा निःश्वास आहे. आपल्या मूलभूत कार्यामधून मानवी संस्कृती विकसित करण्याचे महान कार्य आपल्या संतांनी केले. महाभारतात जे गीतेचे पीक आले होते, त्याची मळणी करुन सर्व लहान-थोर बांधवांना माऊलीने खाऊ  घातले.’’

Leave a Comment