
पुणे, दि.१७ नोव्हेंबर-पवन गांधी जमीन घोटाळा प्रकरणामुळे आधीच अडचणीत असलेले सिहगड इन्स्टिटयूटचे संचालक मारुती नवले यांना महापालिकेचाही दणका बसला. नवले यांच्या सिहगड इन्स्टिटयूटने गेल्या तीन वर्षांपासून तब्बल ३ कोटी रूपयांचा मिळकत कर थकविल्यामुळे संस्थेच्या वडगाव कॅम्पसमध्ये कारवाई करीत इथल्या काही इमारतींना पालिकेने टाळे ठोकले. स्विमिग पूल, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा महापालिकेच्या अधिकार्यांनी सील केली असून, वारंवार नोटीस देऊनही थकबाकी भरली नसल्यामुळेच संस्थेवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेचे मिळकत कर विभागाचे अधिकारी विकास कानडे यांनी दिली.
