गांधी घराण्याने देशाला भिकारी बनविले-रामदास आठवले

पुणे,दि.१६- गांधी घराण्याने या देशाला भिकारी बनविले व आता मतासाठी दारोदार भीक मागत फिरावे लागत आहे अशी टीका रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत केली. ते म्हणाले, राहूल गांधी हे अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरु, आजी इंदिराबाई आणि आई सोनिया यांनी देशाला भिकारी बनविले. ज्यानी सारा देश भिकारी केला त्यांना एका समाजाल भिकारी म्हणण्याचा अधिकार नाही.
सध्या ते महायुतीत आहेत त्याबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसपेक्षा महायुतीचा अनुभव चांगला आहे. महागाई, बेरोजगार, भ्रष्टाचार यांचा सामना करण्यासाठी आम्ही ही युती केली आहे. पुण्यात खडकवासल्यात राष्ट*वादीची जी दारुण पराभवाची स्थिती झाली तीच आगामी निवडणुकीत राष्ट*वादीची होणार आहे. भाजपा सेनेला आम्ही पुण्यात पंचवीस जागा व पिपरी चिचवडयेथे १८ जागा मागितल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. अण्णा हजारे यांच्या अण्णा टीममध्ये नव्या पन्नास जागापैकी आम्ही दहा जागा मागितल्या असल्याचेही त्यानी बोलून दाखविले.

Leave a Comment