कर्जाच्या विळख्यात बेस्ट, लेखापरिक्षकांचे कठोर ताशेरे

मुंबई दि.१४ नोव्हेंबर- बेस्ट उपक्रमाने राज्य सरकारच्या परवानगीविना नियमबाह्यपणे कर्जावर कर्ज घेतले. त्यामुळे  मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रम २४०० कोटी रूपये कर्जात बुडाला आहे. बेस्टने आपला गैरकारभार व पैशांची उधळणपट्टी त्वरित थांबवावी, अन्यथा एक दिवस बेस्ट उपक्रमच बंद पडेल, असा इशारा  मुंबई महापालिका लेखापरिक्षकांनी आपल्या अहवालात दिला आहे.

बेस्ट उपक्रमाने नाहक खर्चाला आवर घालावा. प्रशासकीय खर्चात कपात करावी. उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व उपाययोजना कराव्यात असा सल्लाही लेखापरिक्षकांनी दिला आहे. त्यामुळे आता बेस्टला कर्मचार्‍यांना वेतन कराराअंतर्गत द्यावी लागणारी कोट्यावधी रूपयांची थकबाकी पाहता व लेखापरिक्षकांनी कान उपटल्याने वीज व बसभाडेवाढ करण्याशिवाय बेस्टला पर्याय नाही.

बेस्टने दैनंदिन खर्चासाठी १६०० कोटी रूपये कर्ज घेतले आहे. कर्जावरील व्याजापोटी बेस्ट दरवर्षी १५० कोटी रूपये भरत आहे अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Comment