’रा-वन’चा बॉक्स ऑफिसवर फुसका बार

पुणे,दि.२९-किग खान शाहरूख खानचा सुपरहीरो अवतार असलेला  रा-वन हा बहुचर्चित चित्रपट बुधवारी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस आला.शहरातील मल्टिप्ले*स चित्रपटगृहात या चित्रपटाला चांगले ओपनिग मिळाले होते. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने त्या दिवशी प्रेक्षकांचा साधारण मिळालेला प्रतिसाद योग्यआहे, असे गृहीत धरून येत्या  दिवसात चित्रपत्रगृहात हाऊसङ्गुलचे बोर्ड लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रेक्षकांनी या बहुचर्चित चित्रपटाकडे पाठ ङ्गिरविल्याने शाहरूखसाठी हा चित्रपट ङ्गुसका बार ठरला आहे.
दिवाळी म्हटलं की शाहरूखचा चित्रपट, हे मागील काही वर्षांपासून समीकरण झाले आहे. मागील सोळा दिवाळींच्या मुहूर्तावर किग खानचे आठ चित्रपट सुपरडुपर हिट झाले आहेत. अनेक चित्रपटांतून रोमँटिक भूमिका साकारणारा  किग खान पहिल्यांदाच सुपरहीरोच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला. टु डी बरोबरच थ्रीडी मध्ये प्रदर्शित चित्रपट, स्पेशल इङ्गे*ट, मोठी स्टारकास्ट यामुळे हा चित्रपट सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेणार, हे निश्चित मानले जात होते.
मागील काही महिन्यात रिलीज झालेल्या रेडी, दबंग, बॉडीगार्ड, सिघम या अॅ*शन चित्रपटांना मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून रा-वन कडून अपेक्षा वाढणे साहजिकच होते. मात्र बॉ*स ऑङ्गिसवर सल्लूमियाचा रेकॉर्ड तोडण्यात किग खान यशस्वी झाला नाही.
‘रा-वन’ला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना  मंगला चित्रपटगृहाचे सहव्यवस्थापक गणेश म्हसे म्हणाले, ‘तब्बल दोन वर्षांनंतर किग खानचा चित्रपट आणि प्रसिद्धीपूर्व चर्चेचा विचार करता ‘रा-वन’चे बुकिग दण*यात होण्याची जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. बुधवारी लक्ष्मीपूजन होते यामुळे ६० टक्के मिळालेले ओपनिग चांगले आहे, असे वाटले आणि नंतर प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात स्थिती उलटी झालेली आहे.’ 
विजयचित्रपटगृहाचे व्यवस्थापक हेमंत दाते म्हणाले, ‘रा-वन कडून अपेक्षा भरपूर होत्या. प्रसिद्धी आणि प्रसिद्धीपूर्व चर्चा लक्षात घेता अपेक्षित असलेल्या बुकिंगच्या ५० टक्केही व्यवसायया चित्रपटाने दिला नाही. शाहरूखचा चित्रपट दोन वर्षांनंतर आल्याने व सोबत करिना यामुळे चित्रपट हिट होईल, अशी अपेक्षा होती. ‘देव डी’ सारखा चित्रपटही आमच्याकडे पहिले तीन दिवस हाऊसङ्गुल चालला होता; मात्र ‘रा-वन’ चा एकही शो हाऊसङ्गुल झाला नाही.’

Leave a Comment