नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोघे, कुलकर्णींचे अर्ज

पुणे,दि.२९- येत्या जानेवारी महिन्यात सांगली येथे होणार्‍या अखिल भारतीयमराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सांगली जिल्ह्याचे सुपुत्र ज्यष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे आणि भालचंद्र कुलकर्णी  यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अध्यक्षपदाचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑ*टोबर आहे.नाट्यपंढरी सांगली ही आपली जन्मभूमी आहे. यामुळे इथे होणार्‍या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्यास मिळणे हा माझ्या जीवनातील  आनंदाचा क्षण असेल, असे मोघे यांनी म्हटले आहे. मोघे यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथील आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सांगली येथे झाले आहे व महाविद्यालयात असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले .
अखिल भारतीयमराठी नाट्यपरिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने भालचंद्र कुलकर्णी यांचे नाव सुचविण्यात आले आहे. नाट्यसंमेलनाची सहसंयोजक असलेल्या चितामणनगर शाखेसह नांदेड, संगमनेर, नगर, पिपर -चिचवड, शेवगाव या शाखांचाही मोघे यांना पाठिबा आहे. याशिवायपुणे शाखेतील काही आजीव सदस्यांनी मोघे यांना आपला पाठिबा जाहिर केला आहे. पाच नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आह. यामुळे त्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणुक टाळून ज्येष्ठ रंगकर्मीला अध्यक्ष करायचे, असा निर्णयनाट्यपरिषदेच्या वतीन घेण्यात आलेला आहे. यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment