जुळया आणि तिळ्यांसाठी पुण्यात ‘यमल’ संस्था स्थापन

पुणे- जगातील जुळयांची आणि तिळ्यांची एक मोठी परिषद लवकरात लवकर भरवून त्यांच्या समस्या एकत्र व संघटितपणे सोडविण्यासाठी पुण्यात आज एक संस्था स्थापन करण्यात आली. वीस वर्षापूवीं जागतिकीकरणाचे वारे सुरु झाल्यापासून कोणत्याही बाबीचा  जागतिक दृष्टीकोन नव्याने सुरु झाला आहे. जगातील जुळ्यांची दुनिया तर निराळी आहेच पण आकडेवारीही धक्कादायक आहे. आफ्रिकेत योरोबा हा असा देश आहे की जेथे जुळयांचे प्रमाण पाच टक्के आहे. म्हणजे हजारी पन्नास जुळे -शंभर मुले- असतात. आफ्रिकेच्या अन्य देशात हे प्रमाण सरासरी हजारी पंचवीस जुळी असे आहे.भारतात केरळमधील कोडिनी या दोन हजार कुटुंबे असलेल्या खेड्यात जुळयांची संख्या २२० म्हणजे अकरा टक्के आहे. जगात दरवर्षी एक लाख जुळी जन्माला येत असतात. या प्रकारात तेथे हळूहळू वाढ होवू लागली आहे.अलिकडे तेथे दरवषीं ५० जुळी जन्माला येवू लागली आहेत. पुण्यात आज येथील ज्ञानल मंगल कार्यालयात या जुळ्यांसाठी काम करणार्‍या ‘यमल’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.

Leave a Comment