विख्यात गझल गायक जगजित सिह यांचे निधन

मुंबई, दि.१० ऑक्टोबर- गझल या काव्यप्रकाराला जगभर प्रतिष्ठा मिळवून देणारे सुप्रसिध्द गझल गायक पद्मभूषण जगजित सिह यांची प्राणज्योत सोमवारी मुंबईतील लीलावती रूग्णालयात मावळली. मृत्यूसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. मेंदूत होणार्‍या रत्त*स्त्रावामुळे त्यांना २३ सप्टेंबर रोजी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर तीव्र शोककळा पसरली आहे. जगजीत यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध गझल गायिका चित्रा यांचे तसेच एकुलता एक मुलगा विवेक याचे पूर्वीच निधन झाले आहे.

गझल सम्राट म्हणून ओळखले जाणारे जगजित सिह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानमधील गंगानेर येथे झाला. त्यांच्या पत्नी चित्रा सिह व जगजीत सिह यांनी १९७० च्या दक्षकात देशभर गझल गायनाचे अनेक कार्यक्रम करून हा काव्यप्रकार लोकप्रिय केला. या काळात आकाशवाणी आणि दूरदर्शन या प्रभावी माध्यमांचा उपयोग त्यांनी गझल प्रसारासाठी केला. हिदी आणि उर्दूप्रमाणेच त्यांनी पंजाबी व नेपाळी भाषेतूनही गायन केले.

द अनफर्गोटेबल हा त्यांचा पहिला संगीत अल्बम होय. त्यानंतरही द होप, चिराग, द लव्ह इज ब्लाइंड या त्यांच्या अल्बमनी त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी संगीतबद्ध केलेल्या सजदा या शास्त्रीय संगीत अल्बमला संगीत चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अर्थ, साथ-साथ, प्रेमगीत, सरफरोश, तकरीब आदी हिदी चित्रपटांतून त्यांनी गायलेल्या गझल आज अमर झाल्या आहेत. २००३ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत केले होते.