नक्षल असल्याच्या आरोपावरून पुण्यात ६ जणांना अटक अंनिस आणि मेधा पाटकर यांची संघटनाही चौकशीच्या यादीत

पुणे दि.४- नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या दहशतवाद विरोधी पथकाने सोमवारी सायंकाळी कोंढवा भागातून सहा जणांची धरपकड केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यासंदर्भात राज्यशासनाच्या गुप्तचर विभागाच्या उपसंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांना नक्षलसंघटनांशी संबंधाचा संशय असलेल्या ६२ अशा संस्थांची यादी पाठविली आहे त्यात अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि मेधा पाटकर यांच्या काही संघटनांचा समावेश आहे.
    यातील एकूण ५५ संघटना या डाव्या विचारसरणीच्या आहेत. व ७ संघटना प्रत्यक्ष नक्षली चळवळीचा पुरस्कार करणार्‍या आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे निमित्त करून या संघटना पुण्यात फार मोठ्या प्रमाणावर युवकांना आकृष्ट करतात व हळूहळू नक्षली संघटनेकडे आकृष्ट करतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. येथे लवासा लेकसिटीच्या विरोधात जेंव्हा प्रचारमोहीम सुरु होती तेव्हा काही नक्षल गट त्यात उतरले असल्याचा त्यांना संशय आला त्याच प्रमाणे ओरिसा व झारखंड राज्यात मोठया प्रमाणावर चर्च संघटना व नक्षली चळवळी एकत्र आल्याचे स्पष्ट झाल्याने ती स्थिती महाराष्ट*ात आहे का हे तपासण्यास येथील गुप्तचर संघटनांनी आरंभ केला आहे. त्याला पूरक अशी काही कारणे महाराष्ट*ात आहेत ती म्हणजे मेधा पाटकर यांच्या नर्मदाबचाव आंदोलनाची बरीचसी व्यवस्था चर्चसंघटनाच करीत असत. त्या कामातही त्या संघटना कार्यरत होत्या. मेधा पाटकर यांच्या पत्रकारपरिषदाही चर्चसंघटनांच्या कार्यालयात होत असत. नक्षल संघटना, मेधा पाटकर आणि चर्चसंघटना यांच्या उद्दिष्टात बराचसा सारखेपणा असल्याने ते एकत्र काम करत असल्याचा संशय बळावला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी एक निवेदन दिले असून ‘साधना साप्ताहिकाचा एक अंक आम्ही नक्षली चळवळीवर काढला होता व वारंवार काही विषयही आम्ही हाताळत असतो त्यामुळे पोलीसांनी आमचे नाव त्या घेतले असावे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मे महिन्यातच  दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून आझाद हिंद रेल्वेने पुण्याबाहेर जाऊ पाहणार्‍या दहा जणांना रेल्वे स्टेशनवरच ताब्यात घेतले होते. हे सर्व दहा जण प.मिदनापूर जिल्ह्यातील होते आणि त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. हे सर्वजण सिंदू कनू दलमचे सदस्य होते.

Leave a Comment