नितेश राणेंना स्वाभिमान चालविण्यास संपूर्ण परवानगी-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे घूमजाव

मुंबई, दि.०१ ऑक्टोबर- महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश यांस त्यांची स्वाभिमान ही संघटना स्वतंत्रपणे चालविण्यास काँग्रेसची कोणतीही हरकत नाही, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे. पक्षातील नेत्यांच्या मुलांनी चालविलेल्या इतर संघटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे भीमदेवी थाटाचे वत्त*व्य करणार्‍या माणिकरावांनीच ही कोलांटउडी मारल्यामुळे राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाराष्ट* प्रदेश काँग्रेसची दोनशे पंधरा जणांची जंबो कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर माणिकरावांनी शनिवारी सायंकाळी एका पत्रकारपरिषदेत येत्या ११ ऑक्टोबर रोजी प्रदेश पदाधिकार्‍यांची बैठक होणार असल्याचे तसेच या बैठकीत पदाधिकार्‍यांच्या जबाबदार्‍या आणि आगामी कार्यक्रम निश्चित केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्वाभिमानला प्रदेश काँग्रेसची हरकत नसल्याचे स्पष्ट केले.

गेल्याच वर्षी काँग्रेसमधील पदाधिकारी व त्यांच्या संबंधितांनी संघटना मजबूत करावी, स्वतंत्र संघटनांचे सवते-सुभे स्थापून पक्ष कमकुवत करू नये, अशी भूमिका माणिकरावांनी घेतली होती. उद्योगमंत्री नारायण राणे यांचे दुसरे चिरंजीव खा. निलेश राणे यांचे नाव प्रदेश सरचिटणीस पदासाठी आपणच सुचविले असल्याचे सांगत यात कोणतीही ..प्रिटीग मिस्टेक.. नसल्याचा निर्वाळा देखील ठाकरे यांनी दिला.

Leave a Comment