जनगणना माहिती फॉर्ममध्ये ओबीसींच्या जनगणनेसाठी वेगळा कोड नसल्याचे उघड

पुणे, दि.३०- जातीनिहाय जनगणना २ औक्टोबर पासून सूरू  होत आहे.जनगणना माहिती फॉर्ममध्ये ओबीसींच्या जनगणनेसाठी वेगळा कोड नसल्याचे निदर्शनास आले असून जनगणना फॉर्ममध्ये ओबीसीला  वेगळा कोडनंबर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद वडगांवकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.   
वडगांवकर म्हणाले, जातीनिहाय जनगणना  सुरू होत आहे. परंतु, जनगणनेच्या माहिती फॉर्मवर ओबीसी जात  नोंदवण्यासाठी कोणताही वेगळा कोड  देण्यात आलेला नाही. या फॉर्मवरील कॉलम १३ मध्ये शेड्युल कास्ट,शेड्युल ट्रएब आणि इतर जातींसाठी कोड देण्यात आला आहे. परंतु ओबीसीसाठी कोणताही वेगळा कोड देण्यात आलेला नाही. त्यामुळे ओबीसींची जातवार जणगणना होवू शकत नाही. याची शासनाने नोंद घेवून  ओबीसीसाठी वेगळा कोड द्यावा. त्याच प्रमाणे यंदाची जनगणना ही संगणक प्रणाली  द्वारे होणार असून यामुळे या जनगणनेत फेरफार होण्याची शक्यता आहे. यासाठी ही जनगणना कागद पत्रांवरच व्हावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.  शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांवर घालण्यात आलेली क्रिमिलेअरची अट ही वाढत्या महागाईचा विचार वाढविण्ङ्मात ङ्मावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्यांसाठी राज्यातील ६७ ओबीसी संघटनांच्या वतीने सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे वडगांवकर ङ्मांनी सांगितले.

Leave a Comment