पुण्यात ५० लोकांना वरईचे तांदूळमधून विषबाधा

पुणेःदि.२९-ऐन नवरात्रीच्या सुरूवातीला उपवास सुरू झाले असताना उपवासाचे वरईचे तांदूळ खाऊन विषबाधा झाल्याने पुण्यातील विशेषतः कोथरूड वारजे माळवाडी परिसरातील अनेक जणांना रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णांची संख्या शंभराहून अधिक असल्याची चर्चा सुरू असली तरीही पोलीस आणि महापालिका प्रशासन एवढी संख्या नसल्याचे सांगत आहेत. या विषबाधेची व्याप्ती केवळ पुणे आणि कोथरूड परिसरापुरती मर्यादित नसून कोल्हापूर आणि सोलापुरातही रूग्ण आढळले आहेत.
     नवरात्रीच्या निमित्याने अनेक देवीभक्त भाविकांचे काल बुधवारपासून उपवास सुरू झाले. उपवासासाठी वापरले जाणारे वरईचे तांदूळ खाण्यामुळे कोथरूड येथील कर्वेनगर किष्किंधानगर काळेवाडी परिसरातील किमान ५० जणांना उलटया जुलाब आणि पोटात दुखण्याचा त्रास काल रात्री उशीरा सुरू झाला. या नंतर रात्रीपासून आजपर्यंत रूग्णांची संख्या वाढतंच गेली. कोथरूड परिसरातील रूग्णालयांमधे रूग्णांना दाखल करून देण्यास जागाच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक रूग्णांची प्रकृती स्थिर असून कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे वैद्यकीय अधिकायांनी सांगितले.
     आज गुरूवारी दुपारी ’ळालेल्या आकडेवारीनुसार कोथरूड परिसरातील रूग्णांची संख्या पुढील प्रमाणे
     सहयाद्री रूग्णालय २२ जण दाखल ६ जणांना घरी पाठविले
     कृष्णा रूग्णालय ८ जण दाखल ४ जणांना घरी पाठविले
     संजीवनी रूग्णालय १० जण दाखल
     बुटाला  रूग्णालय ५० जण दाखल ४४ जणांना घरी पाठविले
     अक्षय रूग्णालय ५ जण दाखल
     सुतार रूग्णालय २५ जण दाखल

Leave a Comment