
पुणे दि.२८-गेल्या आठ दिवसांच्या काळात राळेगणसिद्धीला भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी ज्या संख्येने राजकारणी नेते येत आहेत,त्यामुळे अफवांचे पेवच फुटले असून त्यात यूपीए सरकारने अण्णांना शांत करण्यासाठी त्यांना देशाचे सर्वोच्च पद म्हणजे राष्ट*पतीपद देऊ केले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्याच्या राष्ट*पती प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकाल पुढील वर्षी संपतो आहे, त्या पार्श्वभूमीवर अण्णांना राष्ट*पती करणार या चर्चेने अधिकच जोर धरला आहे.
अण्णांना राष्ट*पतीपद देऊ करण्यासंबंधी जी चर्चा सुरू आहे त्यासाठी अण्णांचे दिल्लीत रामलिलावर जे उपोषण सुरू होते त्याकाळात झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचा संदर्भ दिला जात आहे. याच बैठकीत अण्णांना शांत ठेवायचे असेल तर त्यांना राष्ट*पतीपद द्यावे असे सुचविले गेले होते पण एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानेच त्याला विरोध केल्याचेही सांगितले जात आहे. या नेत्याने अण्णा असल्या आमिषाला बळी पडण्याची शक्यता नसल्याचे मत व्यत्त* केल्याचेही सांगण्यात येत आहे.
अण्णाचे निकटवर्ती आणि राळेगणमधील शिक्षक संजय पठारे याविषयी बोलताना म्हणाले की अण्णांना राष्ट*पतीपद ही अफवाच आहे. अण्णा असली ऑफर कधीच स्वीकारणार नाहीत. तसेच कुठल्याच राजकीय पक्षाने राष्ट*पतीपद लाच म्हणून देण्याचा विचारही कधी करू नये हे योग्य ठरेल. राळेगणचे सरपंच आणि अण्णांच्या दिल्लीतील दोन्ही उपोषणांच्या वेळी त्यांच्या सोबतच असलेले जयसिंग मपारी म्हणाले की अण्णा असल्या आमिषाला बळी पडणे कदापिही शक्य नाही. दोन्ही उपोषणांदरम्यान मंत्रीलोक ही काय चीज आहे, याची पुरेपूर ओळख अण्णांना झाली आहे तसेच अण्णा ही काय चीज आहे याची मंत्र्यांनाही ओळख झाली असावी अशी अपेक्षा आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे कोणताही केंद्रीय मंत्री अण्णांना अशी ऑफर देण्याचे धाडस करू धजणार नाही.
गेल्या आठवड्याभरात अण्णांच्या भेटीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, आमदार भेगडे, आमदार बच्चू कडू येऊन गेले असून त्यांनी अनेक विषयांवर अण्णांशी चर्चाही केली आहे. त्याचबरोबर राजकारणाबाहेरच्या अनेकांनीही अण्णांची भेट घेतली असून त्यात सहकार विभाग सचिव राजगोपाल देवरा, पुणे विभागचे माहिती अधिकारी विजय कुवळेकर, तसेच माजी विभागीय आयुत्त* प्रभाकर देशमुख यांचाही समावेश असल्याचे अण्णांच्या निकटवर्तीयांकडून समजले.