सिलिडरचा काळाबाजार रोखण्यासाठी गॅस कंपन्या ग्राहकांच्या बोटांचे ठसे घेणार

पुणे दि.२३- घरगुती वापराच्या गॅस सिलिडर वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी तसेच सिलिडरचा काळाबाजार रोखण्यासाठी गॅस कंपन्यांनी यापुढे ग्राहकांच्या बोटांचे ठसे घेण्याची योजना आखली असून पुढील महिन्यापासून ही योजना पुणे, म्हैसूर व हैद्राबाद या तीन शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. या योजनेला मिळालेल्या प्रतिसाद पाहून नंतर ती सर्व देशभर राबविली जाणार असल्याचे समजते.हिदुस्थान पेट्रोलियम कंपनीने आपल्या ग्राहकांच्या बोटांचे ठसे घेण्याची योजना तयार केली आहे तर इंडियन ऑईल कंपनी त्यांच्या ग्राहकांना युनिक आयडेंटिटी नंबर देणार आहे.
  या योजनेविषयी हिदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीपुढे सध्या सिलिडरचा काळाबाजार, बोगस ग्राहक आणि मधूनच सिलिडर गहाळ होणे अशा अनेक समस्या आहेत. परिणामी गॅस सिलिंडर वितरणात अडचणी निर्माण होत असून सिलिंडर नोंदविलेल्या ग्राहकाला वेळेत सिलिंडर उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे कंपनीने युनिक आयडेंटिटी अॅथॉरिटीबरोबर करार केला असून गॅसग्राहकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात येणार आहेत. ग्राहकाने विशेष विनंती केल्यास घरातील मोलकरणीच्या बोटांचे ठसेही घेण्यात येणार आहेत. सिलिडरची डिलिव्हरी देताना वितरकाचा माणूस हे ठसे कंपनीच्या मध्यवर्ती सर्व्हरवर पडताळून पाहणार असून हे ठसे जुळले तरच सिलिडर दिला जाणार आहे.
  इंडियन ऑईलमधील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या ग्राहकांना युनिक आयडेंटिटी नंबर दिला जाणार आहे. त्यानुसार नोंदविलेली कुटुंबाची माहिती आणि कंपनीच्या सर्व्हरवरील माहिती तंतोतंत जुळली तरच सिलिडरचे वितरण केले जाणार आहे. यामुळे गॅस नोंदणी केलेल्या ग्राहकालाच सिलिडर देणे शक्य होणार असून सिलिडर गहाळ होण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे.
   कंपनीने सिलिडरसाठी नवीन रेग्युलेटरही तयार केले असून माफक किमतीत हे रेग्युलेटर ग्राहकाला पुरविले जाणार आहेत. या नव्या रेग्युलेटरमुळे सिलिडरमधील गॅसची पातळी ग्राहकाला समजू शकणार आहे. त्यामुळे किती गॅस शिल्लक आहे हे बाहेरूनच समजल्याने त्या नुसार नवीन सिलिडर नोंदविणेही सोपे जाणार आहे. सध्याच्या रेग्युलेटरमध्ये तो फत्त* ऑन ऑफ करण्याचीच सोय आहे.

Leave a Comment