मुंबई इंडियन्स संघात सचिनऐवजी सायमंड्सचा समावेश

मुंबई दि .२२ सप्टेंबर- दुखापतग्रस्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जागी मुंबई इंडियन्स संघात ऑस्ट*ेलियाचा धडाकेबाज खेळाडू अँन्ड्रू सायमंड्स याचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारपासून चॅम्पियन्स लीग स्पर्धा सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स संघातील तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना या स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे. सचिन तेंडुलकरसह, रोहीत शर्मा आणि मुनाफ पटेल दुखापतग्रस्त आहेत. त्यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून तांत्रिक समितीने सायमंड्स, अली मुर्तजा आणि धवल कुलकर्णी यांची निवड केली आहे. मुंबई इंडियन्स संघातील आठ खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाहीत. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किग्जविरूध्द शनिवारी एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

Leave a Comment