गौतम गंभीर विवाहबंधनात अडकणार

नवी दिल्ली दि .२२ सप्टेंबर- भारतीय क्रिकेट संघातील धीरगंभीर पण तितकाच धडकेबाज फलंदाज गौतम गंभीर याने विवाह बंधनात अडकण्याचे ठरविले आहे. गौतम गंभीर हा एका व्यावसायिक कुटूंबातील मुलगी नताशा जैन हिच्याशी करणार आहे. या दोघांचे लग्न ऑक्टोंबर किवा नोव्हेंबर महिन्यात होणार असून लग्नासाठी फक्त मोजक्या लोकांना लग्नांचे निमंत्रण दिले जाणार आहे. हा प्रेमविवाह आहे का, हे अजून तरी समजू शकलेले नाही. गौतम हा राहत फतेह अली खानचा चाहता असल्याने त्यांच्या गायनाचा कार्यक्रम लग्न समारंभात ठेवता येईल का, यासाठी तो प्रयत्न करीत आहे. गौतम व नताशा यांच्या लग्नातील फॅशन डिझायनिंग शंतनू व निखिल ही जोडी तयार करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

1 thought on “गौतम गंभीर विवाहबंधनात अडकणार”

Leave a Comment