देशाच्या सर्वांगिण विकासासाठी अत्युच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या पाहिजेत – के.शंकरनारायणन

पुणे दि.१८ -देशाच्या सर्वांगिण विकासासाठी रस्ते,उर्जा, बंदरे, दूरसंचार, जलसंधारण आणि गृहनिर्माण आदी महत्वाच्या क्षेत्रात विकासवृध्दीसाठी अत्युच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल के.शंकरनारायणन यांनी केले.पुणे येथील टॉप मॅनेजमेन्ट कॉन्सॉटोरियम या संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार राज्यपाल के. शंकरनारायणन  यांच्या हस्ते करण्यात आला, तेंव्हा ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.आर.मल्होत्रा, माजी मंत्री मोहन धारीया, सिम्बोयसिसचे कुलपती एस.बी. मुजुमदार, सचिव डॉ. जे.जी. पाटील आणि संस्थेचे कोषाध्यक्ष एस.पी. मल्होत्रा हे उपस्थित होते.
राज्यपाल के. शंकरनारायणन म्हणाले की, पुणे शहर हे आधुनिक शिक्षणाचे केंद्र बनले असून येथे सात विद्यापीठे आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देणार्‍या शैक्षणिक संस्था आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती या नात्याने सांगण्यास अभिमान वाटतो की, जागतिक दर्जाचे विद्यापीठ बनण्याची क्षमता पुणे विद्यापीठात आहे. बहुसंख्य परदेशातील विद्यार्थी पुणे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी इच्छुंक असतात. अधिक विद्यार्थी आणि संशोधक या विद्यापीठात आकर्षित होण्यासाठी विद्यापीठाने सांघिक प्रयत्न करण्याची गरज असून त्यासाठी विद्यापीठाने स्वतःहून आपले माकर्ेटींग करण्याची गरज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आपल्या भारत भेटीच्या वेळी म्हणाले होते की, भारत हे विकसित राष्ट* होण्याच्या मार्गावर नसून ते यापूर्वीच विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. गेल्या चार वर्षात सातत्याने वाढत गेलेला आर्थिक विकासाचा दर हा लक्षणीय असल्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी नमूद केले.
आंतरराष्ट*ीय दर्जाचे शहर म्हणून पुणे शहरास स्थान मिळत असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, जागतिक दर्जाच्या सुविधा पुण्यास  उपलब्ध होऊ लागल्या आहे. या शहरातील व्यवस्थापन, प्रशासन, व्यापार, औद्योगिक संशोधन, संरक्षण आदी क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यत्त*ी या शहराचे वैचारिक धन आहे तथापि, पुरस्कारामुळे या व्यत्त*ींची जबाबदारी अधिक वाढली आहे, अशा शब्दात त्यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा गौरव केला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते  बजाज ऍटो व्यवस्थापकीय संचालक मधुर बजाज, डॉ. अजिक्य पाटील, पुणे विमान प्राधिकरणाचे पी.एस.के.एस सुधाकर, ऍटो उद्योगाचे डॉ. जॉन चाको (व्यवस्थापक व्होक्स वॅगन), पुण्याचे पोस्ट मास्टर जनरल के. सी. मिश्रा, विश्वजित जव्हर, सेवा क्षेत्रातील इंडिया सेप्टी वॉल्ट लिमिटीडचे एच.बी.सईचा, डॉ. अनिल हब्बु, कँम्प एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त वालचंद संचेती, ऍड़. एस.के. जैन, चोकी दाणीचे संचालक अमितकुमार आणि आज का आनंदचे संपादक श्याम अग्रवाल यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.  पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यत्त* केले.   अमेरिकेतील कॅलीफोर्नीया विद्यापीठाचा ऍलमन्स हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. उर्वशी सहानी यांचाही यावेळी राज्यपालांच्या हस्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला. 

Leave a Comment