गुगल आणि यु ट्यूबवर बंदी घालण्याचा पाक सरकारचा इशारा

इस्लामाबाद दि.१८ सप्टेंबर – वाढते गुन्हे आणि दहशतवादासारख्या घटनांच्या तपासासाठी सहकार्य न केल्यास गुगल तसेच यु ट्यूब या प्रसिध्द सर्च इंजिन्सवर बंदी घालण्याचा इशारा पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री रहमान मलिक यांनी दिला आहे. तालिबान तसेच इतर दहशतवादी संघटना संपर्कासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतात, हे आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे आणि दहशतवाद्याच्या घटनांच्या तपासासाठी वेबसाईट चालकांनी सरकारला मदत केली पाहिजे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही, असे मलिक यांनी सांगितले.

Leave a Comment