गणेशोत्सवातला उत्साह

पुण्यातल्या ३२ गणश मंडळांवर पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.विसर्जन मिरवणुकीत कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल या नोटिसा आहेत.या प्रकाराने मंडळचे प्रतिनिधी चिडले आहेत आणि त्यांनी या नोटिसांना सर्वोच्य न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. ही ३२ मंडळे एकत्रित येऊन हे आव्हान देतील आणि  पोलिसांनी दिलेल्या या नोटिसा मागे घ्याव्यात अशी मागणी तर करतीलच पण या नोटिसा देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या कराव्यात अशीही मागणी करतील.  असे पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी म्हटले आहे. त्यांनी या नोटिसांचे वर्णन खाकी दादागिरी अशा शब्दात केले आहे. या दादागिरीला सर्वोच्य न्यायालयात आव्हान दिले जाईल असे गोडसे म्हणत असले तरी ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल. न्यायालयात या ३२ मंडळांची बाजू मांडण्याची कामगिरी नामवंत वकिलांवर सोपविली जाईल आणि त्याचा खर्च आपले मंडळ करील असे गोडसे यांनी जाहीर केले आहे. प्रत्यक्षात ते वकिलांकडे जातील किवा सर्वोच्य न्यायालयातही जातील तेव्हा त्यना, अशा नोटिसांच्या निमित्ताने थेट सर्वोच्य न्यायालयात जाता येत नसते याची कल्पना येईल. या संबंधात दोन पातळ्यांवर चर्चा करावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांनी दिलेल्या नोटिसा या प्रचलित कायद्याला  धरून आहेत की नाही ? हे प्रथम पहावे लागते. या नोटिसा तशा कायद्याला धरून असतील तर पुढची चर्चा होईल.

रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक लावण्यास कायद्यानेच बंदी केलेली आहे. हा नियम राज्यात कसोशीने पाळला जात असतो. तो नियम सर्वोच्य न्यायालयाच्या सांगण्यावरूनच करण्यात आला आहे. त्याला काही वेळा अपवाद करता येतो. तो कधी करायचा हे जिल्हाधिकारी ठरवत असतात. ते वर्षातून काही अपवादात्मक कार्यक्रमात १० नंतर दोन तास म्हणजे १२ पर्यंत परवानगी देऊ शकतात. रात्री १२ ते सकाळी सहा या सहा तासत ध्वनिक्षेपक लावताच येत नाही. तेव्हा या निर्बंधांचे उल्लंघन कोणी केले असेल  आणि त्याबद्दल पोलिसांनी नोटिसा दिल्या असतील तर  या नोटिसांना खाकी दादागिरी कसे म्हणता येईल ? अशा नोटिसांना सर्वोच्य न्यायालयात आव्हानही तिथे सार्वजनिक  उत्सवाचे स्वरूप कसे असते याची वर्णने आपण नित्य ऐकत आणि वाचत असतो. आपण त्यांच्या प्रमाणे आपल्या उत्सवाला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न का करीत नाही ? फ्रान्स मध्ये रस्त्यावर नमाज पढण्यावर तिथल्या सरकारने सक्त  बंदी घातली आहे. अमेरिकेतही धर्माचे पालन करण्यास अनुमती आहे पण कोणालाही आपला धर्म रस्त्यावर आणता येत नाही. उत्सव साजरे करावेत पण त्यातल्या आपल्या उत्सवाचा उपद्रव कोणाला होता कामा नये एवढे पथ्य पाळले पाहिजे. आपल्या उत्साहाचे परिणाम अन्य कोणाला भोगावे लागत असतील तर त्यांना या उत्साहाला हरकत घेण्याचा अधिकार आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.