युवक काँग्रेस प्रदेध्याक्षपदासाठी रस्सीखेच नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये चुरस

नागपूर दि.०६ सप्टेंबर- राज्यात सध्या युवक काँग्रेसच्या कार्यकरणीच्या निवडणूकीचे वारे वाहत आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजीत तांबे यांच्यात अध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे. सत्यजीत हे विलासराव देशमुख गटाचे उमेदवार आहेत, तर निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात विश्वजीत कदम  यांच्या पाठीमागे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांची फौज उभी केली आहे.

अध्यक्ष पदापत्रमाणे  उपाध्यक्ष पदासाठीसुद्वा अनेक नेत्यांच्या नातेवाईकांमध्ये चुरस आहे. रोजगार मंत्री  नितीन राऊ त यांचा मुलगा कुणाल राऊ त, माजी खाजदार नरेश पुगलीया यांचा मुलगा राहूल पुगलीया  माजी आमदार अझहर हुसैन यांचा मुलगा जिशान हुसैन यांच्यासह अनेक राजकारण्यांच्या नातेवाईकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामुळे युवाक काँग्रेसची निवडणूकी ही काँग्रस नेत्यांच्या नातेवाईकांचीच होणार असल्याची चर्चा होत आहे.  निवडणूक १७ व१८ सप्टेंवरला होणार असून  निकाल २० सप्टेंबरला जाहीर होणार आहे. राज्यात सुमारे ५७ हजार मतदारांपैकी सर्वाधिक १७ हजार ५०० मतदार विदर्भात आहे. विधानसभा लोकसभा मतदारसंघ आणि प्रदेश कार्यकारिणीसाठी येत्या १७ व १८ सप्टेंबरला मतदान होणार आहे. बहुतांश ठिकाणी स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या गटानुसार मतदारांचे गट आहेत. त्या आधारे प्रत्येक गट जोडतोडीच्या राजकारणाला लागला आहे. बूथपातळीवर सुमारे ५७ हजार पदाधिकारी निवडून आले असून ते या  निवडणूकीत मतदार आहेत. विदर्भात १७ हजार ५००, पश्चिम महाराष्ट*ात १६ हजार ५००, मराठवाड्यात १४ हजार ५०० तर उत्तर महाराष्ट*ात १० हजार. ठाण्यासह कोकणात ३ हजार मतदार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले लक्ष विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट*ावर केंद्रीत केले आहे.

Leave a Comment