नाशिक परिसरातील धरणे तुडूंब भरली,तिघांचा नदीत बुडून मृत्यू

नाशिक दि.०६ सप्टेंबर- नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू असून, गंगापुर धरण तुडूंब भरले आहे. या धरणातून सोमवारी ३३ हजार १२० क्युसेक्स पाणी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने गोदावरी नदीतून पाणी ओसंडून वाहत आहे. दरम्यान जिल्हातील सटाणा व मालेगाव तालुक्यात नदीपात्रात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्हात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजून कायम आहे. कायम दुष्काळाच्या वणव्यात हेारपळत असलेल्या येवला व नांदगाव तालुक्यात पावसाने शंभरी गाठल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक तर निफाड तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.  नाशिक शहरात रविवारी पावसाची संततधार  सुरू होती. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गांगापुर धरण तुडूंब भरले आहे. हे पाणी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक ांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे दारणा, कडवा, चणकापुर, वालदेवी आदी धरणे तुडूंब भरली आहेत. यावेळी सटाणा तालुक्यातील औदाणे येथील हत्ती नदीच्यापात्रात बुडून प्रवीण पवार व योगेश तवर या दोघांचा, तर मालेगाव येथील नदीच्या पात्रात आनंद वाघरी याचाही बुडून मुत्यू झाला.

Leave a Comment