शेतकर्‍यांना कार्यशैली बदलायला लावणारा काळ आलाय

या आठवड्यातील पावसाने सर्वांनाच चकित करून सोडले आहे. पश्चम महाराष्ट्रात पूरस्थिती आहे तर मध्य पश्चम महाराष्ट्राचा नगर, सोलापूर असा पूर्व पट्टा आणि विदर्भ मराठवाडा या भागात ‘छप्पर फाडके ’पाअूस  झाला आहे. पंधरा दिवसापूवींपर्यंत दुष्काळ जाहीर करण्याची चर्चा सुरु होती आता तशी स्थिती नाही आणि छप्पर फाडके जरी पाअूस झाला असला तरी पिकांची स्थितीही समाधानकारक नाही. पावसाचे जाणकार जो अंदाज व्यक्त करत आहेत त्यानुसार पुढील दोन महिने अधिक पाउस पडण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपर्यंत जसा पाअूस हवा असतो त्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर तो नको असतो पण गेली पाच वर्षे तो ऑक्टोबर व नंतर हा पाउस वाढतच आहे. गेली पाचही वर्षे पाउस आणि परंपारिक सरासरी यांचा फारसा काही संबंध राहिलेला नाही. ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या आसपास पाउस असतो आणि मोसमी पावसाची मोजमापे घेताना ऑक्टोबरनंतरचा पाउस हा मोसमी पाउस न धरण्याची पद्धत असते पण पाउस हा पाउसच असतो. त्यामुळे आणि त्याचा जेंव्हा उपयोग नसतो तेंव्हा त्याचा त्रास असतो. गेल्या पाच वर्षाची पुनरावृत्ती यावर्षी झाली तर मात्र शेतकर्‍यांच्या तरुण पिढीने याची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. कारण त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाप्रमाणे शेतकर्‍यांनाही आपली कार्यशैली बदलायला लावणारी स्थिती येणार आहे.
शेतकर्‍याने शैली बदलायचे ठरविले तरी काही येणारा पाउस थांबवू शकत नाही आणि पाउस येणार असे गृहीत धरून जरी पिकांची रचना केली तरी प्रत्यक्षात पावसाची खात्री देता येत नसल्याने शैली बदलायची म्हणजे नुकसानीची तयारी ठेवायची असेच वाटणे सहाजिक आहे. पण प्रत्यक्षात मात्र असे म्हणावेसे वाटते की, जूननंतर दोन महिने कमी पाउस आणि नंतर सरासरी दीडपटीने ओलांडणारा पाउस होणार असेल तर तरुणांनी कमीत कमी खर्चात ग्रीन हाउस तयार करायला लागले पाहिजे. यावर्षी कसा पाउस पडेल, असा प्रश्न जेंव्हा गेल्या पाच वर्षात पावसाच्या क्षेत्रात अचूक अंदाज सांगण्याचा इतिहास करणार्‍या डॉ रामचंद्र साबळे यांना विचारला तेंव्हा त्यांचे म्हणणे असे पडले की, गेली पाच वर्षे आपण ऑक्टोबरमध्ये पाउस पडण्याचा अनुभव घेत आहोत यावर्षी तर नोहेंबरपर्यंत पाउस पडत राहील,असे वाटू लागले आहे. त्याचा थोडासा प्रतिकूल परिणाम द्राक्षे, डाळींब वगैरे फळपिके आणि सोयाबीन भात अशी पारंपारिक पावसावर आधारित पिके यावर होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शेतकर्‍यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याच्या आधारे गेल्या दहा वर्षाच्या पावसाचा विचार केला तर दरवर्षी पावसाचे प्रमाण वाढते आहे पण काळाची त्यात अनिश्चतता असल्याने नुकसानीची शक्यता वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर येथे ग्रीनहाउसच्या तयारीला लागावे लागणार आहे.

सध्या तरी शेतकर्‍यांना ग्रीन हाउस परवडणेच शक्य नाही, पण ते तंत्रज्ञान अवघडही नाही. त्यामुळे शेतीची अनेक अवघड कामे शेतकरी जसा घरी करतो त्याप्रमाणे सवडीच्या काळात घरी छोटी छोटी ग्रीन हाउसेस तयार करायला आरंभ करणे आवश्यक आहे. दहापंधरा शेतकर्‍यांच्या गटाने जर हे काम मनावर घेतले तर ते अवघड अजिबात नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरणवाहू शेतीत घरी बनविलेल्या ग्रीन हाउसच्या मदतीने बागाईतचा परिणाम साधणारे तरुण आज महाराष्ट*ात आहेत. पश्चम महाराष्ट्रच्या दोन उभ्या पट्ट्यात यावेळी दोन स्वतंत्र प्रकारची स्वतंत्र स्थिती आहे. गेल्या आठवड्यात येथे एका बाजूला सुका दुष्काळ तर दुसर्‍या बाजूला ओला दुष्काळ असे वाटयला वाव होता. आता पूर्व पट्ट्यातील स्थिती पावसामुळे सुधारली आहे आणि पश्चम पट्टयातही पूरस्थिती असली तरी ओला दुष्काळ असल्याची स्थिती नाही. या पट्ट्यात मोसमी पावसाची सरासरी केंव्हाच  ओलांडली असली तर अजून दोन महिने जर पाउस असेल तर परिस्थिती बदलू शकते पण रब्बीला आणि उसासारख्या नगदीपिकाला हा पाउस चांगला आहे. आणि पुढचे दोन महिने सतत पाउस नसल्याने रब्बीची पिके काढायलाही फार काही समस्या येणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.
गेली तीनही वर्षे राज्यकर्त्यनी ‘यावर्षी दुष्काळाची शक्यता आहे, महागाईची तयारी ठेवा’ असे संसदेत सांगून महागाई वाढवून घेतली आहे. अशी महागाईची घोषणा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून पंतप्रधान डॉ मनमोहन सिगच होते.महागाई वाढण्याची शक्यतेची घोषणा करतानाच ते कधी तीन महिन्यांनी तर कधी सहा महिन्यांनी महागाई कमी होईल, असेही आश्वासन देतात पण महागाई वाढताना पंतप्रधानांच्या आदेशाबर हुकुम वाढते पण जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या वेळा मात्र कोणी सांभाळत नाही. पण गेल्या तीन वर्षाची स्थिती आणि यापुढची स्थिती यात एक फरक आहे तो म्हणजे नव्याने जागृतीचे एक नवे पर्व येताना दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसात अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनास त्यांचे व्यक्तिमत्व हे जसे महत्वाचे कारण आहे त्याही पेक्षा कारण ठरली आहे ती गेल्या पाच वर्षात वाढलेली जीवघेणी महागाई.हेही अधिक महत्वाचे कारण आहे. गेल्या तीन वर्षातील महागाई ही भ्रष्टाचाराने वाढली असल्याने पुढील तीन वर्षे तरी शेतीमालाचा प्रश्न हा आंदोलनाच्या ऐरणीवर राहणार आहे. गेल्या आठवडयात दुधाचे दर चाळीसवर गेले आहेत. गेल्या सात महिन्यात दुधाचे दर सात रुपयांनी वाढले आहेत. पण शेतकर्‍याकडून खरेदीचे दर मात्र फक्त पावणेतीन रुपयापेक्षा वाढले आहेत. यातील अजून एक नाजूक मुद्दा आहे. तो म्हणजे दूध खरेदीच्या वेळी सात फॅटचा आग्रह धरला जातो आणि जे दूध शहरात मिळते त्यात तीच फॅट पाचच्या आसपास असते. याच सोसायट्या जेंव्हा पाच फॅटचे दूध खरेदी करतात तेंव्हा ते अजून सहा रुपये स्वस्तात खरेदी होते. दूध भेसळीची अजून जी तंत्रे वापरली जातात त्यांचा विचार  करता त्यात फक्त पाण्याची शुद्ध  भेसळ नसते हे सगळ्यांना पटूनही कोणी काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. दुधात निम्म्यास निम्मे भेसळ करूनही त्याच्या तपासणीत काहीही सापडता नये, यावर महाराष्ट्रत पीएचडी केलेले महाभाग आहेत.
शेती उत्पादनाचे एकूणच खरेदीचे दर आणि विक्रीचे दर हा पुढील दोन तीन वर्षात सर्वात अधिक ऐरणीवर येणारा प्रश्न असणार  आहे. पण सामान्य माणूस त्या दृष्टीने बोलका झाला तरच हा प्रश्च धसास लागणार आहे.पिळवणूक होणारा सामान्य माणूस कधी शेतीमाल उत्पादक असतो तर कधी ग्राहक असतो आणि उपेक्षा त्यांच्या पाचवीस पुजलेली असते.पुढील काळात आंदोलने होण्याची शक्यता स्पष्ट दिसते आहे. सामान्य माणसाच्या समस्येसाठी जेव्हा सामान्य माणूसच आंदोलनाला उभा राहताना दिसतो तेंव्हाच ते यशस्वी होते . यापूवीं कधीही नव्हे अशा पद्धतीने सामान्य माणूस आंदोलनाला उभा राहताना दिसतो आहे. यावेळी आपण आपल्याला दिसणार्‍या समस्यांच्या संदर्भात किमान बोलके तरी होणे आवश्यक आहे.
– मोरेश्वर जोशी, पुणे

1 thought on “शेतकर्‍यांना कार्यशैली बदलायला लावणारा काळ आलाय”

Leave a Comment