बँक ऑफ अमेरिका,गोल्डमन सॅक्स विरूद्व अमेरिकेन सरकार खटले भरणार

न्यूयॉर्क दि.३ सप्टेंबर- अमेरिकेला आर्थिक मंदीच्या खाईत लोटणार्‍या बँक ऑफ अमेरिका, जे.पी. मॉर्गन चेख, गोल्डमन सॅक्स आणि डाइच्छ बँक यांच्यासह सुमारे डजनभर प्रमुख बँकांवर खोटी तारणपत्रे सादर केल्याप्रकरणी खटले भरण्यात येणार आहे.या बँकानी खोट्या तारणपत्राच्या जोरावर करून अमेरिकन शासनाकडून अब्जावधी डॉलर्सची नुकसान भरपाई घेतली.कर्जाची परत फेड भरण्यास कर्जदार असमर्थ झाली आणि  परिणामी अमेरिके ला आर्थिक दिवाळखेार व मंदीचा सामना करावा लागला.
बँकांच्या तारण व्यावहारात देखरेख ठेवणार्‍या फॅ न्नी मे अॅण्ड फ्रेडी या राष्ट*ीय गृह वित्तसंस्थेने या तारण व्याहारात सुमारे ३० अब्ज डॉलर्स गमावले. हा पैसा करदात्यांचा होता. असे फॅन्नी अॅण्ड फ्रे डांचे म्हणणे आहे. तारणव्याहार करणार्‍या बँकांनी तारणपत्रांची वित्तीय रोख बाजारात विक्री केली. परंतु तारण देताना कागदपत्रांची पुरेशी आणि योग्य प्रकारे छाननी केली नसल्याने गृहकर्जाचा बुडबुडा फुटताच या तारण पत्रांना बाजारात किंमत उरली नाही. परिणामी अनेक बँकांचे दिवाळे निघाले. गृहखर्च मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या उत्पन्नाची  खोटी माहिती दिली. फेडरल हाऊ सिंग फायनान्स एजन्सनीने याबाबत विविध वित्तीय संस्थांना सुमारे वर्षभरापूर्वी नोटीसा पाठवून याबाबत माहिती  मागविली होती. त्यातुन हा घोटाळा उघडकीस आला. आसाच आणखी एक घोटाळा यू बि एस या ताराण व्यवहारांना वित्तीय पुरवठा  करणार्‍या अन्य एका संस्थेने केल्याचेही उघड झाले आहे.

Leave a Comment