पाकिस्तानी तरूण एफबीआयच्या कचाट्यात

वाशिग्टन दि.३ सप्टेंबर- लष्कर-ए-तोय्यबा या दहशदवादी संघटनेला पाठिबा दिल्याबद्दल पाकिस्तानी तरूणाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. जुबैर अहमद असे याचे नाव असून या तरूणाकडे अमेरिकन कायदेशीर नागरिकत्व आहे. याने पाकिस्तानमध्ये असताना लष्करी-ए-तोय्यबा या दहशदवादी संघटनेकडून प्रशिक्षण घेतल्याचा आरोप एफबीआयने केला आहे. हा आरोप सिद्व झााल्यास त्याला दहशदवादाला पाठिबा दिल्याबद्दल १५ वर्ष आणि तपास चालू असताना खोटे बोलल्याबद्दल ८ वर्ष, अशी शिक्षा सुनवण्यात येऊ  शकते .
अहमद त्याच्या कु टूंबासह २००७ राजी अमेरिकेला आला होता . त्याचे लष्कर-ए- तोयबा बरोबर संबंध असल्याच्या संशयावरून एफबीआयने २००९ राजी त्याची चौकशी चालू केली होती. लष्कर-ए-तोय्यबाच्या संघटनेचा नेता हफीझ मोहम्मद सईद याचा मुलगा तल्हा सईद याच्या संपर्कामध्ये अहमद असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या व्हिडीओशी आपला काहीही संबध नसल्याचे अहमद याने सांगितले आहे.

Leave a Comment