देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया …

शेगाव दि.३ सप्टेंबर-  देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया… अशी वंदना करीत श्रीच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त एक लाखाहून अधिक भाविकांनी संत गजाननाच्या समाधि वर माथा टेकविला. गेल्या वर्षीच्या डोळ्यांची  पारणे फेडणार्‍या समाधी शताब्दी सोहळ्याच्या आठवणींना भाविकांनी उजाळा दिला. पुण्यतिथी सोहळ्यासाठी सकाळपासूनच संतनगरीत भावभक्तीचा माहोल निर्माण होता.
राज्याच्या कानाकोपर्‍यातून दीड हजार भजनी दिड्या ४० हजार वारकर्‍यांसह शेगावात दाखल झाल्या होत्या. आनंद विसावा परिसरात टाळमिृदंगाचा गजर आसमिंत निनादून सोडत होता. सकाळपासूनच दर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच रांग लागली होती. राक्षसभुवन येथील ब्रह्मवृदांच्या मंत्रोच्चारात गणेश यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान झाले. संस्थानचे व्यस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्याहस्ते विधिवत पूजा करण्यात आली . दुपारी शेगावचे धार्मिक वैभव असणारा पालखी सोहळा सुरू झाला. अश्व, गज, रथ मेण्यातून श्रींच्या रजत मुखवट्याची पालखी निघाली. टाळ मृदंगाचा गजर, गण, गौळण, अभंगाच्या तालावर फेर धरून बच्चे कंपनीसह वारकरी पालखी सोहळ्यात मग्न झाले.

Leave a Comment