चीनचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार भारतीयाला

बीजिग दि.०२ सप्टेंबर- भारतीय प्राध्यापक बी. आर. दीपक यांना चीनचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार शुक्रवारी प्रदान करण्यात आला. दीपक यांनी ८८ चिनी अभिजात कवितांचा हिदीमध्ये अनुवाद केला आहे. त्याप्रित्यर्थ त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. चीनचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार एका भारतीयाला प्रथमच देण्यात आला आहे.

दीपक हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील चीन व दक्षिण आशिया अभ्यास विभागाशी संलग्न प्राध्यापक आहेत. चीनी भाषेचा अभ्यास, भाषांतर, चीनी पुस्तकांचे प्रकाशन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी दीपक यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

दीपक यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये ख्रिस्तपूर्व कालातील ११ ते १४ व्या शतकामधील विभिन्न कालखंडात लिहिल्या गेलेल्या चिनी कवितांचा अनुवाद करण्यात आला आहे. या कालखंडातील वेगवेगळया सांस्कृ तिक परंपरांचा परामर्श देखील या पुस्तकामध्ये घेण्यात आला असून पुस्तकामध्येच मूळ चिनी मजकूरही पुरविण्यात आला आहे. कू युआन या कवीच्या देशभक्तीपर कविता तसेच वेगवेगळया चिनी राजवटींमधील लोकगीतांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.    

Leave a Comment