गणेशोत्सवात मांगल्य आणि चांगले उपक्रम याला प्राधान्य हवे

गणेशोत्सवातील रोंभासोंभा नृत्ये ही पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यातील एक बिकट समस्या होती.पण पुण्यातील गणेशोत्सवप्रेमी मंडळींनी प्रयत्न करून तो प्रकार मोडून काढला.गेल्या वीस वर्षात आदर्श गणेशोत्सवाला बक्षिसे सुरु झाली आहेत आणि त्यातून अनेक उपक्रम सुरु झाले आहेत.दरवर्षी एक एक कोटी रुपये खर्चाची सार्वजनिक कामे करणारी मंडळे या पुण्यात आहेत.आता गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण होवू नये म्हणून गेली पाच सहा वर्षे सुरु असलेला प्रयत्न यावर्षी अधिक व्यापक प्रमाणावर होतो आहे.
गणपती हे दैवत सध्या सत्तर देशात एक  महत्वाचे दैवत मानले जाते.हे दैवत पाचही खंडात जायला सुरुवात झाली त्याला किमान पाच हजार वर्षें झाली.गेल्या शंभर वर्षात त्या सर्व देशात गणेशोत्सव पोहोचला आहे.अश्वन महिन्यात सर्वत्र होणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी ११८ वर्षापूर्वी पुण्यात सुरु केला त्यातूनच हे पर्व सुरु झाले आह.पुण्यात गेल्या काही वर्षात सुरु झालेले हे पर्व अन्यत्रही उपयोगी ठरू शकेल
जगभर ज्या ज्या देशात गणपती हे दैवत पोहोचले, तेथे आता गणेशोत्सव पोहोचले आहेत. भारताबाहेर सत्तर देश असे आहेत की तेथे गणपती हे प्रमुख दैवत आहे आग्नेय अशियातील पंचाण्णव टक्के मुस्लिम समाज असलेल्या इंडोनेशिया, मलेशिया वगैरे देशातील एकही घर दरवाजाची गणेशपट्टी लाकडी गणपतीची सुबक मूर्ती असल्या खेरीज असलेले दिसत नाही. चीन जपानसह सर्वत्र गणपती हा बौद्ध दैवतात समाविष्ट आहे.ज्या ठिकाणी ही गणेश दैवते आहेत. तेथे त्या त्या संस्कृती प्रमाणे साग्रसंगीत पूजा आहे. प्रत्येक ठिकाणी अगदी ‘सुख कर्ता दुखहर्ता  किवा कर्पूरगौरम् करूणावतारम् अशी  आरती होते, असे नव्हे पण बहुतेक ठिकाणचे स्चरूप अर्थववेदातील ‘शीर्ष ’ सूक्त म्हणजे अथर्वशीर्ष या मधील वर्णनासारखे आहे.
    गणेशोत्सव सुरू होउन यावर्षी ११८ वर्षे होत आहेत, या काळात हा सार्वजनिक गणेशोत्सव हळू हळू विस्तारत  आहे. अर्थात गणपती च्या जगभर पोहोचण्याच्या गतीपेक्षा  गणेशोत्सवाची गती मोठी आहे. सार्वजनिक गणोशोत्सवाच्या व्याप्तीचा आज उल्लेख करायचे कारण असे की, गणेशोत्सवाच्या सार्वत्रिकरणाबरोबर त्यात जे दोष आले व त्यातून ज्या समस्या निर्माण झाल्या, त्या नाहीशा करण्याच्या दृष्टीने पुण्यात गेली चार पाच वर्षे कांही उपक्रम सुरू झाले, त्याला चांगले यश येउ लागले आहे, सुमारे पंचवीस तीस वर्षापूर्वी गणेशोत्सवातील रोंभासोंभा नृत्य आणि अचकट विचकट गाणी यामुळे नको तो गणेशोत्सव अशी स्थिती झाली होती त्याचा कंटाळा येउन म्हणा किवा चांगल्या गणेशोत्सवाची आवड निर्माण  झाली म्हणून म्हणा, अनेक ठिकाणी चांगले उपक्रमसुरू झाले आहेत. या आठवडयात पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी प्रत्यक्ष गणेशोत्सवातील सर्व प्रकारची प्रदूषणे टळावीत, या साठी कांही प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रत्यक्ष गणेशोत्सव सुरू व्हायला अजून पंधरा दिवस अवकाश आहे. बहूतेक ठिकाणी मांडव, मूर्ती, देखावे, वर्गणी, मंडळे यांची लगभग सुरू झालेली आहे. प्रदूषण टाळण्यासाठी जे उपाय करायचे, ती उपाययोजना करायची हीच वेळ आहे.
    गणेशोत्सवाच्या काळातील कर्णकर्कश संगीत ही सर्वात मोठी समस्या असते. अलिकडे सर्व ध्वनिक्षेपक कर्ण्यांनी म्हणजे त्यांच्या चघेकोनी खोक्यांची भिेतच्या भिंत उभी करण्याची पद्धत सुरू झाली आहे. छोटया मोठया खोक्या बसवलेले कर्णे उभे केलेले असतात., जेवढे कर्णे अधिक तेवढा आवाज अधिक कर्कश हा त्यातील एक पैलू  असतो.एखाद्या महालांत सर्व वाद्ये स्वतंत्र वाजत असताना त्याचा मैहफील परिणाम आपोआप निर्माण होतो. तो परिणाम गणोशोत्सवात त्या भिेतीने तयार केला जातो. त्याही पेक्षा  महत्वाचे म्हणजे चित्रपटात जसे ‘थ्रीडी ’ इफेक्ट तंत्र वापरले जाते तसेच लाउडस्पीकरचेही ‘थ्री डायमेन्शन ल इफेक्ट ’ तंत्र निर्माण केले जाते. ध्वनिक्षेपकाच्या खोक्याची भित केंचितशी गोलाकार असते. विशिष्ट भागात तो आवाज एवढया जोराने फेकला जातो की, त्या भागातील प्रत्येक वस्तू कंपित होते. साधारणपणे भूकंपाचा परिणाम जाणवू लागतो. अलिक ड पाश्चात्य पद्धतीवरचे संगीत परिणामतः ठोक्याचे संगीत झाले आहे. एखाद्या महाविद्यालयाच्या परिसारात  ते लावले तर त्या अनेक मुले सहभागी होतात असे नव्हे तर मोठया प्रमाणावर मुलीही सहभागी होतात,सारे वातावरण केवळ भारून जाते. एवढेच नव्हे ते कंपायमान होते. महाविद्यालयांच्या परिसरात निदान तेथील नियामंच्या मर्यादा असतात गणेशोत्सवात मुक्त वातावरणाला अधिक वाव असतो. अशा म्युझिक सिस्टीम च्या आवाजाची तीव्रता दीडशे डेसीबलपर्यंत  जाते. मानवी जीवनात  आवजाची प्रदूषणा साठ डेसिबल ला सुरू होते. रस्त्यावर जेंव्हा वाहती वाहने असतात, तेंव्हा ही तेथील आवाज ७० डेसिबलचा आवाज कानावर पडल्याने ऐकू येण्याच्या अवयवावर  वाईट परिणाम होतो व कांही दिवसांनी बहिरेपणा जाणवू लागतो. कान दुखणे हे तर कायमचे होउन बसते.
    अशी प्रदूषणाता आटोक्यात आणणे ही सामाजिक गरज असली तरी ती तरूणाई च्या पचनी पाडणे अशक्य असते. जर मुलांना त्याचा आनंद लुटू दिला नाही तर त्यांना ‘ क्लब ’ आणि ‘पब’  आपले वाटू लागतात.  यातून मार्ग काढण्यासाठी पुण्यातील कांही तरूणांनी कांह प्रयोग केले आणि त्याला फार चांगले यश मिळाले.
    ध्वनिक्षेपकांच्या खोक्यांची भिेत करण्याऐवजी ती खोकी विखरून लावली तर त्याचा भूकंप परिणाम नाहीसा होतो. ते संगीत कर्णमधूर तर होतेच पण त्याच बरोबर त्या गाण्यातील आशय समजू लागतो.गणेशोत्सवातील ध्वनि प्रदूषण नियंत्रणात आणून त्यात  ‘मांगल्य ’  वाढावे यासाठी ही गेली ७¬-८ वर्षे प्रयोग सुरू होता. सध्या ५० हून मंडळे यात सहभागी झाली आहेत. आता यावर्षी कितीजण  त्यात सहभागी होतात ते बघायचे.या सार्‍या उपक्रमाला सुरवात करणारे आनंद सराफ याबाबत बोलताना म्हणाले, स्वर सम्राज्ञी  लता मंगेशकर यांनी या बाबतच्या मूळ सूचना  केल्या होत्या. लातदिदी यांचा पुण्याच्या गणेशोत्सवाशी अतिशय  जिव्हाळ्याची संबंध आहे. साठ वर्षापूर्वी  त्यांच्या गाण्याची सुरवात पुण्याच्या श्रीमंत दगडू हलवाई गणपती समोर  झाली

 पुण्याच्या गणेशोत्सवाने ११८ वर्षे पाहिली आहेत. त्यात ३० -३५  वर्षापूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीत रोंभासोंभा नृत्यांचा अतिरेक झाला होता. अर्थात हे रोंभासोंभा नृत्यही या गणपती समोरच सुरू झालेले . १९४० च्या दरम्यान रोंभासोंभा नृत्याचा शिल्पकार  मास्टर भगवान हा पुण्यात असे. तेंव्हा तो कब्बडी खेळाडू म्हणून  खेळायचा त्या कब्बडीचे रूपांतर त्यांने रोंभासोंभा नृत्यात केले.पण १९८० पासून श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट*स्टने आदर्श सजावट व आदर्श मिरवणूक यांची स्पर्धा लावली मोठमोठी अनेक बक्षिसे लावली त्यातून प्रेरणा घेउन अनेक संस्थांनी गणेशोत्सवात स्पर्धात्म बक्षिसे सुरू झाली. त्याचा परिणाम एवढा चांगला झाला की,अनेक मंडळे केवळ या बक्षिसावर  १० दिवसांचा गणपतीचा उत्सव साजरा करू लागली.

अलिकडे वर्षातील अन्य सार्वजनिक उपक्रमातही वैशिष्ठयपूर्ण  उपक्रमांची लोण पोहोचले आहे.अकरा मारूती चौक मंडळाने यावर्षी गोकुळाष्टमी च्या दहीहंडीला पैशाऐवजी मुलांची पुस्तके लावली आणि ती कमी उंचीवर ठेउन बाल मजुरांच्या गोविंदा मंडळांना मुद्दाम निमंत्रण दिले. त्यांच्यासाठी शिक्षणाच्या आवश्यकतेवर आधारित ‘ कृष्णसुदामा ’ असा कार्यक्रम ठेवला.नंतर सर्वानाच  दहीकाल्याचे जेवण दिले. हा उपक्रम पुढील वर्षापासून अन्यत्रही सुरू व्हावा, असा प्रयत्न केला जाणार आहे.पुण्याचा गणेशोत्सवाचे वैशिष्ठय म्हणजे ११८ वर्षापूर्वी लोकमानस दिळकांनी त्याची सुरवात पुण्यात केली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच तो अन्य जिल्हयात  पसरला आणि १९४० पासून तो गुजराथ, कर्नाटक या मुंबई इलाख्यााच्या क्षेत्रात सुरू झाला, आंध्र प्रदेशात निजाम विरूद्ध  लढा  उभा करण्यासाठी गणेशोत्सवाचा उपयोग झाला. सध्या तामीळनाडू  केरळ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश वगैरे सर्वत्र त्याचा प्रसार झाला एवढेच  नव्हे तर बृहद भारताचा भाग असलेल्या श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, मलेशियरा, येथेही तेवढयाचा उत्साहात होतात.गेल्या २०¬-२५ वर्षात युरोप आणि अमेरिकेत जेथे  जेथे भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रीय मंडळी जाउन पोहोचली, त्यासर्व ठिकाणी गणपती सुरू झले आहेत.हळू हळू मंगोलियन वंशाच्या  देशात म्हणजे जपान, चीन कोरिया इकडे त्याचे लोण पोहोचत आहे.प्रथम गणपती उत्सव सुरू होतो,  तो सांस्कृतिक प्रेरणेतून होतो पण नंतर केंव्हातरी तेथे ‘रोंभासोंभा’ सारखे कांहीतरी अचकट विचकट पर्व येते.  त्यात कुणातरगी बदल करण्याचे  आवश्यकता असते. त्यादृष्टीने पुण्यात गेल्या १०-१५ वर्षात सुरू झालेल्या सुधारणा अन्यत्रही उपयोगी ठरणार्‍या आहेत.
मोरेश्वर जोशी,पुणे.

Leave a Comment