नागपूरात निघाले कपिल सिब्बल, कलमाडी, ए राजाचे बडगे

नागपूर दि.३० ऑगस्ट – नागपूरच्या ऐतिहासिक बड्या-मारबत उत्सवावर ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव दिसून आला. प्रचंड उत्साह पाडव्याचा उन्माद भ्रष्टाचारा विरोधातील चिड व्यक्त करताना काही नेत्यांच्या बडग्यांना चपलांचा हार टाकून, चपलांचा मार देत…. नायक नहीं खलनायक हूं मैं, जुल्मी बडा नालायक हूं मैं या गीतावरील गीताचा  तालावर नागपूरकरांनी मारबत – बडग्या उत्सावात  भ्रष्टाचार, महागाई आणि भ्रष्टाचारी नेत्याविरोधात आपला रोष व्यक्त केला.
विदर्भाचे सांस्कृति वैभव असलेल्या या लोकोस उत्सवात यंदा काळ्या मारबतीला १३१ वर्ष तर पिवळ्या मारबतीला १२७ वर्ष पूर्ण झाली आहे.सुरेश कलमाडी, ए. राजा, लालूप्रसाद यादव, काजीम मुनी आदी नेत्यांचे पुतळे जाळण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी आणि मिरवणुकीच्या मार्गावर इमारतींच्या छतावर उभे असलेल्या नागरिकांनी भ्रष्ट नेत्यांचे बडगे आल्यावर उत्स्फूर्त घोषणा देऊन आपला जाहीर निषेध व्यक्त केला. उत्सवात लोकपाल विधेयकासाठी उपोषण करणार्‍या अण्णा हजारेंवर टिका करणार्‍या केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांचा समाचार घेण्यात आला.कपटील सब्बल, वा रे कप्पील तेरा खेल, अण्णा, रामदेवको भेजा जेल, देश के भ्रष्टाचारी को जूते मारो… अशा शेलक्या घोषणेत त्यांचे पुतळे काढत नागपूरकरांनी आपला संताप व्यक्त केला. दरवर्षी या मिरवणूकीत जनतेच्या मनात खदखदत असलेला राग बडग्यांच्या आणि फलकावर लिहिलेल्या घोषणांच्या माध्यमातून व्यक्त होतो.पण यावर्षी मात्र सर्वच पक्षांच्या भ्रष्टाचारी नेत्यांविरुद्ध पुतळे काढून रोष व्यक्त करण्यात आला. या उत्साहात एका फलकावर अण्णा हजारे यांचे समर्थन करणारे चित्र काढले होते. यात महात्मा गांधी अण्णांची प्रशंसा करीत आहे आणि सारे भ्रष्टाचारी नेते कारागृहात बंदीस्त असल्याचे चित्र होते.
१३१ वर्षापूर्वी या मारबत उत्साहाचा प्रारंभ समाजातील अनिष्ठ प्रतेचे उच्चाटन करण्याच्या हेतूने करण्यात आला. तेव्हापासून वेगवेगळ्या मुद्यांवर मारबत व बडगे काढण्याची परंपरा केवळ विदर्भात सातत्याने सुरू आहे. मारबत आणि बडग्यांच्या माध्यमातून समाजातील अनिष्ठ प्रथांवर प्रहाराने टीका केली आहे.

Leave a Comment