अण्णा हजारे यांचे आंदोलन अतियश उपयोगी – डॉ मोहनराव भागवत

पुणे,दि.३०- समाजात सर्वच ठिकाणी भ्रष्टाचाराची परिसीमा झाल्याने अण्णा हजारे यांचे आंदोलन अतियश उपयोगी ठरत आहे देशातील जनतेनेही ते उचलून धरले आहे. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनराव भागवत यांनी आज पुण्यात जनतासहकारी बँकेच्या कै.मोरोपंत पिगळे स्मृती पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना सांगितले. तो पुरस्कार एक लाख रुपयांचा असून नागपूरच्या सक्षम या संस्थेस देण्यात करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमात बँकेचे लाभांश वाटपही करण्यात आले. एकशे पंचवीस कोटी रुपयांचा तोटा असताना तो पार करून बँकेने आठ वर्षानंतर सत्तावीस कोटी रुपयांचा नफा केल्याबद्दल सरसंघचालकांनी बँकेस शाब्बासकी दिली ते म्हणाले, बॅकेने हे उदाहरणच घालून दिले आहे.
आपला समाज हा मूळचा भ्रष्टाचारी स्वभावाचा नाही तरीही गेल्या काही वर्षात सर्वत्र भ्रष्टाचार हीच जीवनशैली हअून बसला आहे त्या पाश्र्वभूमीवर अण्णा हजारे यांनी ज्या तडफेने आंदोलन केले ते अतिशय महत्वाचे आहे.बँकेच्या संदर्भात ते म्हणाले, शुद्ध संकल्पाने कामाला लागले की नियतीही नेहेमी मदत करत असते बँकेला अडचण आली आणि बँकेचे कर्मचारी, संचालक आणि ग्राहक यांनी जिद्दीने उभे राहून ते संकट दूर केले. बँकिग क्षेत्रात असे उदाहरण नाही त्यामुळे ही बँक हे अन्य संस्थासाठी उदाहरणही ठरले आहे.
संस्थेला या अडचणीतून बाहेर काढणारे बँकेचे विद्यमान कार्याध्यक्ष अरविदराव खळदकर यांचा सत्कारही करण्यात आला.या प्रसंगी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावणारे  जबलपूरचे श्री प्रशांत पोळ,तसेच श्री सदानंद भागवत, विजयराव भावे यांचाही सत्कार करण्यात आला.मोरोपंत पिगळे पुरस्कार प्राप्त झालेले सक्षम या संस्थेचे वरीष्ठ पदाधिकारी श्री अविनाश संगवई म्हणाले, सक्षम ही संस्था अंध आणि विकलांगाना सक्षमकरण्याचे काम करते. देशात पंचवीस राज्यात ते काम सुरु आहे. आता अंधाना काठीखेरीज चालता येणे आणि प्रामुख्याने लिहीता येणे यावर संशोधनात्मक काम सुरु आहे.याप्रसंगी बँकेचे भागधारक मुंबईचे मधुभाई ठक्कर, मराठवाड्यातील अप्पासाहेब लातुरे, गुंडप्पा माने, तसेच प्रसन्न पाटील, मुकंुद तापकीर यांना प्रातिनिधिक स्वरुप लाभांश देण्यात आले.

Leave a Comment