गौतम गंभीर एकदिवसीय मालिकेला मुकणार

लंडन,३० ऑगस्ट- भारतीय क्रिकेट संघाला दुखापतींनी ग्रासले असताना आघाडीचा फलंदाज गौतम गंभीरसुध्दा जायबंदी झाला आहे. अनेक प्रकारच्या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला  मुकणार आहे. इंग्लंड दौर्‍याच्या सुरूवातीपासूनच भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडू  दुखापतग्रस्त होवून मायदेशी परतले होते. त्यात झहीर खान, हरभजन सिग, युवराज सिग यांचा समावेश होता. भरीस भर म्हणून इशांत शर्मा, वीरेंद्र सेहवागही दुखापतीमुळे दौर्‍यातून बाद झाले. त्यांच्या पाठोपाठ गंभीरचा क्रमांक लागल्याने भारतीय संघावर अरिष्ट कोसळले आहे.
ओव्हलवरील कसोटी सामन्यादरम्यान केविन पीटरसनचा झेल घेण्याच्या प्रयत्नात गंभीर डोक्यावर पडला. वैद्यकीय चाचणीत त्याची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. परंतू गेले काही दिवस एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात त्याला त्रास होत असून स्पष्ट दिसतही नाही. गेल्या १० दिवसात त्याच्या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर त्याला मायदेशी परत पाठविले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी कुणाला स्थान मिळेल याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. भारत विरूद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका ३ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.जर गौतम गंभीर खेळू शकला नाही तर सलामीवीरांचा प्रश्न गंभीर होण्याची शत्त*ता आहे. ससेक्स आणि केंटविरूद्ध लढतीत भारताने राहुल द्रविड-पार्थिव पटेल, सचिन तेंडुलकर-पार्थिव पटेल अशी सलामी जोडी उतरविली होती. कसोटी मालिकेत भारताला एकही सामना जिकता आलेला नाही. वर्ल्ड कप जिकल्यापासून भारतीय संघाच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले आहेत.

Leave a Comment